after lockdown kissing competition in chinese industry photo viral 
ग्लोबल

चीनला आता म्हणावे तरी काय? भरवली 'किसींग' स्पर्धा...

वृत्तसंस्था

बीजिंग (चीन) : चीनच्या वुहान शहरापासून चार महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरवात झाली. या कोरोनाने जगभरात हाहाकार उडवला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये कोरोना आटोक्यात येऊ लागल्यानंतर त्यांनी आता 'किसींग' स्पर्धा भरवली. जगभरातून टीका होऊ लागली आहे.

चीनमध्ये लॉकडाऊन हटवल्यानंतर परिस्थितीती सुधारू लागली आहे. कर्मचारी कामावर जाऊ लागले असून, अनेक उद्योग धंदे सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच आनंदोत्सव म्हणून विविध प्राण्यांच्या मांसाची विक्री करण्यात आली होती. यावेळी हजारो नागरिक जमा झाले होते. एका कारखान्याने तर कहरच केला असून, 'किसींग' स्पर्धा भरवली. शिवाय, स्पर्धेमधील छायाचित्रे व्हायरल केली. यानंतर जगभरातून टीका होऊ लागली. नेटीझन्स तीव्र प्रतिक्रिया नोंदवताना दिसतात.

सूझौ शहरातील एक कारखाना पुन्हा सुरू झाला. कारखान्यातील कर्मचार्‍यांनी विचित्र पद्धतीने उत्सव साजरा केला. कर्मचारी एकमेकांना चुंबन करत होते. मात्र, यावेळी कर्मचार्‍यांमध्ये आरसा ठेवण्यात आला होता. टीका होऊ लागल्यानंतर कंपनीचा मालकाने सांगितले की, 'किसिंग स्पर्धेदरम्यान कोणतेही नियम मोडले नाहीत. आम्ही स्पर्धकांमध्ये आरसा ठेवला होता. सहभागी झालेल्या कर्मचाऱयांपैकी काही जण विवाहित जोडपे होते. कोरोनामुळे तणावाचा सामना करावा लागला होता. कर्मचाऱयांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT