Sheikh Hasina sakal
ग्लोबल

Sheikh Hasina : बांगलादेशात संसद विसर्जित ; अध्यक्षांकडून घोषणा, ढाक्यातील तणाव घटला

बांगलादेशमध्ये आंदोलनानंतर पंतप्रधानांनाच राजीनामा देऊन परागंदा व्हावे लागल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना आज देशाचे अध्यक्ष महंमद शहाबुद्दीन यांनी संसद विसर्जित करण्याची घोषणा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

ढाका : बांगलादेशमध्ये आंदोलनानंतर पंतप्रधानांनाच राजीनामा देऊन परागंदा व्हावे लागल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना आज देशाचे अध्यक्ष महंमद शहाबुद्दीन यांनी संसद विसर्जित करण्याची घोषणा केली आहे. शेख हसीना यांचे सरकार गेल्यामुळे आंदोलन निवळले असले असून हिंसाचारातही घट झाली आहे. आंदोलकांनी नोबेल विजेते महंमद युनूस यांना देशाचे नेतृत्व करण्याची विनंती केली असून त्यांनीही ती मान्य केली आहे.

बांगलादेशमध्ये लष्कराने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी हाती घेतली आहे. देशातील हिंसाचार पूर्णपणे शमला नसला तरी कमी झाला आहे. देशाचे अध्यक्ष शहाबुद्दीन यांनी आज तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख, विविध राजकीय पक्षांचे नेते, विद्यार्थी आंदोलक यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षीय कार्यालयाने निवेदनाद्वारे ही माहिती दिली. बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांना तुरुंगातून मुक्त केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच, एक जुलैपासून अटक केलेल्यांची सुटका करण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. संसद विसर्जित झाल्याने देशात नव्याने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हंगामी सरकारसाठी चर्चा

आंदोलकांच्या १३ जणांच्या समितीने आज संध्याकाळी हंगामी सरकारबाबत अध्यक्ष शहाबुद्दीन यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी तिन्ही सेनादलांचे प्रमुखही उपस्थित होते. नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ महंमद युनूस यांना देशाचे नेतृत्व करण्याची विनंती केली असून त्यांनीही तयारी दर्शविली असल्याचे आंदोलकांनी सांगितले. बांगलादेशात आज रात्री उशिरा हंगामी सरकारची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हसीना यांच्या पलायनानंतर लष्करानेही अनेक वरीष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून काहींची हकालपट्टीही केली आहे.

हसीनांपुढे पर्याय काय?

शेख हसीना त्यांची ब्रिटिश नागरिक असलेल्या भगिनी शेख रेहाना यांच्यासह लंडनमध्ये शरणागती पत्करण्यापूर्वी भारतात तात्पुरत्या आश्रयासाठी आल्या आहेत. सध्या त्यांना भारतीय गुप्तचर सेवेची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ब्रिटनने आश्रय देण्यास नकार दिल्यामुळे पुढचे चित्र स्पष्ट होईपर्यंत त्यांना भारतात राहावे लागणार आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसक आंदोलनाची कोणतीही चौकशी झाल्यास त्याविरुद्ध हसीना यांना कायदेशीर संरक्षण देता येणार नाही, असे ब्रिटनने म्हटले आहे. रेहाना यांच्या कन्या ट्युलिप सिद्दीक ब्रिटनमधील सत्ताधारी मजूर पक्षाच्या संसद सदस्य असल्यामुळे शेख हसीना यांनी ब्रिटनच्या आश्रयास जाण्याचे ठरविल्याचे म्हटले जात आहे. हसीना यांच्या कुटुंबातील सदस्य फिनलँडमध्ये असल्यामुळे त्यांनी हेलसिंकीला जाण्याचा पर्याय ठेवला आहे. हसीना यांच्या कन्या साईमा वाजेद दिल्लीतील जागतिक आरोग्य संघटनेच्या विभागीय प्रमुख आहेत. पण त्यांच्या दिल्लीतील वास्तव्याचा हसीना यांना लाभ होण्याची शक्यता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT