Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये परिस्थिती चिघळली आहे. अनेक समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. इस्लामाबादमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडलेल्या आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी संपूर्ण पाकिस्तानात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच आता ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, भारतीय संरक्षण दलांकडून पाकिस्तानातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. याचपार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवरील दक्षता आणि गस्त वाढवण्यात आली आहे, संरक्षण दलातील सुत्रांच्या हवाल्यानं त्यांनी ही माहिती दिली.
इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारासह देशभरात अनेक खटले सुरू आहेत. इस्लामाबाद पोलिसांनी मंगळवारी इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली.
अल-कादिर ट्रस्ट केस इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांच्या पीटीआय पक्षाच्या इतर नेत्यांवर अल-कादिर विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भातील आरोपांशी संबंधित आहे. हे प्रकरण त्यांचे सरकार आणि प्रॉपर्टी टायकून यांच्यातील कथित समझोत्याशी संबंधित आहे. त्यामुळे पाकिस्ताच्या अर्थव्यवस्थेला 50 अब्ज रुपयांचे नुकसान झाले.
अटकेनंतर इम्रान खान समर्थकांनी थेट लष्करी कार्यलयांवर हल्ला केला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येत आहे. बलुचिस्तानमधील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराने निदर्शना दरम्यान आंदोलकांवर गोळीबार केला. गोळ्या लागल्याने अनेक आंदोलक जखमी झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. याच अनुषंगाने आता सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.