Indian Medicines esakal
ग्लोबल

Indian Medicines : उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांचा मृत्यू; WHO म्हणतं, भारतात तयार होणारी 'ही' औषधं मुलांना देऊ नका!

भारताच्या मेरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले कफ सिरप मुलांसाठी वापरले जाऊ नये, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

सकाळ डिजिटल टीम

उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागानं यूपीच्या मेरियन बायोटेक कंपनीचा उत्पादन परवाना रद्द केला आहे.

Uzbekistan 19 Children Death : उझबेकिस्तानमध्ये 'कफ सिरप' खाल्ल्यानंतर मुलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर नोएडास्थित फार्मा मेरियन बायोटेकवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेनंही (World Health Organization) यासंदर्भात अलर्ट जारी केलाय.

डब्ल्यूएचओनं (WHO) शिफारस केलीये की, नोएडास्थित कंपनी मेरियन बायोटेकनं बनवलेले दोन कफ सिरप मुलांना देऊ नयेत. भारताच्या मेरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले कफ सिरप मुलांसाठी वापरले जाऊ नये, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

जागतिक आरोग्य संघटनेनं AMBRONOL सिरप आणि DOK-1 Max सिरप बाबत अलर्टही जारी केलाय. चाचणी दरम्यान, या दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य पातळी आढळलीये, असं त्यांचं म्हणणं आहे.

डिसेंबर महिन्यात उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं दावा केला होता की, भारतीय औषध कंपनीनं बनवलेल्या औषधांचं सेवन केल्यामुळं देशातील किमान 18 मुलांनी आपला जीव गमावला आहे. WHO नं म्हटलंय, 'या दोन्ही उत्पादनांना या क्षेत्रातील इतर देशांमध्ये विपणन अधिकृतता असू शकते. ते अनौपचारिक बाजारपेठेद्वारे इतर देश किंवा प्रदेशांमध्ये देखील वितरित केले जाऊ शकतात.' दुसरीकडं, उझबेकिस्तानमध्ये 18 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागानं यूपीच्या मेरियन बायोटेक कंपनीचा उत्पादन परवाना रद्द केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

IPL 2025 Mega Auction Live Streaming: अर्जुन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्सला नकोसा झाला, ३० लाखांतही कोणी बोली नाही लावली

Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्या अंतिम युक्तिवाद

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

SCROLL FOR NEXT