वॉशिंग्टन : सायबर सुरक्षा पुरवणारी कंपनी ‘क्राऊडस्ट्राइक’च्या एका अपडेटमधील एररमुळे जगभरातील अनेक मोठ्या व्यवसायांना आलेल्या अडथळ्यातून यंत्रणा आता पूर्वपदावर येत असताना काही समाजकंटक मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करतो, असे सांगून सरकारी संस्था आणि कंपन्यांना फसविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आढळून आले आहे.
अपडेट एररमुळे विमानसेवा, बँकिंग यंत्रणा, पर्यटन सेवा शुक्रवारी ठप्प पडल्यानंतर आता ती बऱ्याच अंशी पूर्वपदावर आली आहे. काही सायबर हल्लेखोर मात्र अडचणीच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे विविध देशांच्या सायबर सुरक्षा संस्थांनी आणि ‘क्राऊडस्ट्राइक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज कर्ट्झ यांनीही सांगितले आहे.
हे हल्लेखोर स्वत:ला ‘क्राऊडस्ट्राइक’चे कर्मचारी असल्याचे सांगत विविध कंपन्यांना मदत देऊ करतील आणि लुबाडतील, असा इशारा कर्ट्झ यांनी दिला आहे. त्यामुळे केवळ अधिकृत कर्मचाऱ्याकडूनच तुम्ही मदत घेत आहात ना, याची खात्री करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.