Air India Air Hostess  Esakal
ग्लोबल

Air Hostess: मारहाण करत फरफटत नेले... Air India च्या होस्टेसबरोबर लंडनच्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Air Hostess Assult: पीडितेने केलेल्या आरडाओरड्यामुळे आत आलेल्या तिच्या सहकाऱ्यांकडे पाहून घुसखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अखेर हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.

आशुतोष मसगौंडे

या आठवड्याच्या सुरुवातीला लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका हॉटेलच्या खोलीत एअर इंडियाच्या होस्टेसवर घुसखोराने जोरदार हल्ला केला. यासह तिला हँगरने मारहाण कर फरफटत नेले.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एअर होस्टेसने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने शेजारच्या खोलीतील तिच्या सहकाऱ्यांनी पीडितेला वाचवण्यासाठी त्वरीत धाव घेतली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

पीडितेने केलेल्या आरडाओरड्यामुळे आत आलेल्या तिच्या सहकाऱ्यांकडे पाहून घुसखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अखेर हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.

त्या रात्री...

गुरुवारी (१५ ऑगस्ट) रात्री लंडनच्या एका हॉटेलमध्ये एअर इंडियाच्या केबिन क्रू मेंबरवर एका अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार करून जखमी केले.

ही घटना लंडनच्या हिथ्रो येथे असलेल्या रेडिसन रेड हॉटेलमध्ये घडली, जिथे एअर इंडियाचे अनेक कर्मचारी थांबले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाची क्रू मेंबर तिच्या हॉटेलमध्ये झोपली असताना रात्री 1.30 च्या सुमारास एका व्यक्तीने खोलीत घुसून तिच्यावर हल्ला केला. यामुळे ती चांगलीच घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला.

स्वत:चा बचाव करण्यासाठी तिने हल्लेखोरावर कपड्याच्या हँगरने हल्ला केला. दरम्यान, संधी साधून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्या व्यक्तीने तिला पकडून पुन्हा खोलीत ओढले.

हल्ल्यानंतर एअर होस्टेसला गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांना भारतात परत पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा घुसखोर हा बेघर माणूस असू शकतो ज्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याची खरी ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

या घटनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्था आणि हॉटेलच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान समोर आलेल्या या प्रकरणाला एअर इंडियाने दुजोरा दिला आहे. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, या घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले. आम्ही आमचे सहकारी आणि टीम यांच्या संपर्कात आहोत. एअर इंडिया स्थानिक पोलिसांसोबत कायदेशीर मुद्द्यांवरही काम करत आहे. तसेच हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले. विमान कंपनीने म्हटले आहे की ती आपल्या क्रू मेंबर्स आणि स्टाफ सदस्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT