Al-Zawahiri Sakal
ग्लोबल

अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा झाला.

सकाळ डिजिटल टीम

Al-Qaeda Leader Killed In US Drone Strike : अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी ऑपरेशनमधील अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला ठार मारण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच 9/11 हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा झाला. ड्रोनद्वारे दोन क्षेपणास्त्र डागण्यात आली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. त्यावेळी त्याच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यदेखील उपस्थित होते. मात्र, या हल्ल्यात त्यांना कोणतीही इजा झालेली नसून केेवळ जवाहिरी मारला गेला आहे.

अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी हा इजिप्शियन सर्जन होता जो नंतर जगातील सर्वात वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक बनला. 11 सप्टेंबर 2001 रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणूनही त्याची गणना करण्यात आली होती. त्या दहशतवादी घटनेत सुमारे 3 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

जवाहिरीवर अमेरिकेने 25 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. 2011 मध्ये पाकिस्तानात ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर तो अल-कायदावर लक्ष ठेवत असे. न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएन यांनी अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 31 ऑगस्ट 2021 रोजी अमेरिकन सैन्याने देशातून माघार घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील अल-कायदावरील अमेरिकेचा हा पहिला ड्रोन हल्ला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT