आपल्या पृथ्वीप्रमाणेच (Earth) अंतराळात अनेक असे ग्रह आहेत जिथे जीवन आहे असं आपण अनेकदा ऐकत आलोय. अनेकदा शास्त्रज्ञांकडून एलियन्सच्या अस्तित्वाबाबत (proofs of Aliens) अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत. जगातील काही लोकांनी तर एलियन्स प्रत्यक्ष बघितल्याचा दावाही केला आहे. आकाशात स्पेसशिप (Spaceships) म्हणजेच एलियन्सच्या UFO (Aliens UFO) चा तबकडीसारखा आकार दिसल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत तब्बल १२० वेळा अशा घटना घडल्याचं सांगण्यात आलंय. मात्र आता या सर्व गोष्टींच्या समोर जाऊन अमेरिकेतील काही अधिकाऱ्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. (Aliens have their secret bases in deep ocean said ICER officers)
एलियन्स हे अंतराळातून नाही तर चक्क समुद्रातून आणि महासागरांतून येत आहेत असा दावा इंटरनॅशनल कोएलिशन फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल रिसर्च (ICER) अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकी सैन्याचे जहाज महासागरात असताना अशा प्रकारचे अनेक तबकड्यांचे आकार त्यांना दिसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काही वर्षांआधी अमेरिकेच्या नौदलाच्या एका जहाजाला एलियन्सच्या उडत्या तबकड्यांनी घेराव घातला होता. त्यानंतर ते समुद्रात गायब झालं त्यामुळे एलिअन्सचे सिक्रेट बेस हे महासागरांच्या आतमध्ये आहेत असा दावा करण्यात आला.
या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एलियन्सचे UFO हे सतत महासागरांमधील पाण्याच्या आत-बाहेर करत असतात आणि ते अनेकदा आपल्याला दिसतात. आपल्याला पृथ्वीवरील महासागरांबाबत केवळ ५ टक्केच माहिती आहे, महासागरांच्या आत काय दडलं आहे याबाबत आपण अजूनही अनभिज्ञ आहोत. त्यामुळे एलिअन्सचे सिक्रेट बेसेस महासागरांच्या तळाशी असू शकतात.
खरं म्हणजे जितकी रहस्यं अंतराळातील ग्रहांबाबत आणि आकाशगंगेबाबत आपल्याला माहिती आहेत तितकी कदाचित महासागरांच्या तळाशी नक्की काय चाललंय याबाबत नाही. आपण मंगळापर्यंत पोहोचलो आहोत मात्र महासागराची अचूक खोली अजून कोणीही मोजू शकलं नाहीये.
काही जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे, एलियन्सचे UFO हे ट्रान्समीडिअम आहेत म्हणजेच जमीन, हवा आणि पाणी या सर्व गोष्टींमध्ये ते सुरक्षित राहू शकतात. जर हे खरं असेल तर एलियन्स खोल पाण्यात आतमध्ये तळ ठोकून राहू शकतात असं म्हणता येऊ शकतं.
जर एलियन्स खरंच खोल महासागरांत राहत असतील तर समुद्रांमध्ये निर्माण होणारे चक्रीवादळ आणि इतर विध्वंसक गोष्टी या नैसर्गिक आहेत की घडवून आणल्या जात आहेत याबद्दलही संभ्रम निर्माण होतो. मात्र अशा कुठल्याही गोष्टींचे पुरावे नाहीत.
अमेरिकी नौदलाच्या जहाजाला UFO कडून घेराव घालण्यात आला होता याबाबतच्या चर्चा होऊ लागल्या आणि याबाबतचे व्हिडीओ ही आले. याबाबत अमेरिकी गुप्तचर एजन्सीकडून रिपोर्ट तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे रिपोर्ट या महिन्यात येणं अपेक्षित आहेत. या रिपोर्ट्समधून अनेक गुप्त आणि आश्चर्यकारक गोष्टी बाहेर येऊ शकतील.
(Aliens have their secret bases in deep ocean said ICER officers)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.