वॉशिंग्टन- कोरोना महामारीच्या काळात प्रचंड नफा कमावणारे अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी मोठी घोषणा केली आहे. यावर्षीच्या शेवटापर्यंत पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. बेझोस यांनी कंपनीला पत्र लिहून या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागले. मात्र, टेक जायंट अॅमेझॉनने प्रचंड कमाई केली. असे असताना जेफ बेझोस यांच्या निर्णयामुळे अनेकांचा आश्चर्य वाटत आहे.
पुतिन यांनी घेतला बदला? अॅलेक्सी नवाल्नी यांना कोर्टाने सुनावली कठोर शिक्षा
जेफ बेझोस यांनी पत्रात म्हटलंय की, मी या वर्षीच्या तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सीईओ पद सोडेन. जेफ बेझोस यांची जागा अँडी जॅसी घेतील. जेसी सध्या अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. अँडी जॅसी यांना अॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पाहायला मला आवडेल. ते या पदाची जबाबदारी उत्तमरित्या संभाळतील, असं जेफ बेझोस म्हणाले आहेत. अँडी जॅसी यांनी मार्केटिंग मॅनेजर म्हणून 1997 साली सुरुवात केली होती. त्यांनी 2003 मध्ये वेब सर्व्हिसेस AWS ची स्थापना केली. अॅमेझॉनला मोठा नफा कमवून देणारी ही एक उपशाखा आहे.
2020 वर्षात टेक कंपनीला मोठा फायदा झाला. अॅमेझॉनच्या भरारीमुळे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. पत्नीला दिलेल्या घटस्फोटामुळे त्यांच्या संपत्तीत काही प्रमाणात घट झाली. बेझोस आपल्या निवेदनात म्हणाले आहेत की, ''अॅमेझॉन आज जेथे आहे, त्यामागे नव्या संकल्पना आहेत. मी सध्या अॅमेझॉनला एका चांगल्या स्थितीत पाहतो. त्यामुळे बदलासाठी हीच खरी वेळ आहे.'' अॅमेझॉनने 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीसाठी वित्तीय निकाल जाहीर केला. 2020 च्या शेवटच्या तीन महिन्यांत कंपनीने 100 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.
दरम्यान, 1995 मध्ये जेफ बेझोस यांनी स्टार्टअप म्हणून अॅमेझॉन लॉन्च केले होते आणि आज जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. जेफ बेझोस यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, हा प्रवास सुमारे 27 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. अॅमेझॉन ही केवळ एक कल्पना होती त्याचे नाव नव्हते. त्या काळात मला बर्याचदा प्रश्न विचारला जात असे की, इंटरनेट म्हणजे काय? आज आम्ही 1.3 दशलक्ष प्रतिभावान, समर्पित लोकांना नोकरी देतो. कोट्यवधी ग्राहकांना आणि व्यावसायांना सेवा देत आहोत. जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक म्हणून अॅमेझॉनची जगात ओळख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.