Twins News esakal
ग्लोबल

Twins Case : मुली जुळ्या पण अंतर एक वर्षाचं; टेक्सासमध्ये अजब केस

सकाळ डिजिटल टीम

Twins in texas : जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी यांचा जन्मदिन एकाच तारखेला येतो. मात्र टेक्सासमध्ये एक घटना अशी घडली आहे ज्यामध्ये दोन्ही मुली जुळ्या आहेत मात्र त्यांच्या जन्मामध्ये एक वर्षाचं अंतर आहे.

ही बातमी वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. परंतु तांत्रिक बाबीमुळे हे सत्य झालं आहे. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये हा प्रकार घडला असून केली जो आणि क्लिफ यांच्या जुळ्या मुलींनी वेगवेगळ्या वर्षात जन्म घेतला.

केली जो यांनी आपल्या जुळ्या मुलींचं नाव एनी जो आणि एफी रोज असं ठेवलं आहे. याच्यातल्या एनी जोचा जन्म ३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी झाला तर दुसरी मुलगी एफी रोज हिचा जन्म १ जानेवारी २०२३ रोजी १२ वाजून १ मिनिटांनी झाला. जो यांनी आपल्या मुलींचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.

केली यांनी पोस्टमध्ये मुलींचं तब्येत ठीक असल्याचं नमून केलं आहे. या मुलींचं वजन ५.५ पाऊंड आहे. केली आणि त्यांचे पती क्लिफ मुलींच्या जन्मामुळे खूप खूश असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे जन्माच्या तारखेवरुन घडलेला प्रकारही त्यांनी आनंदाने स्वीकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT