अमेरिकेत व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार अँथनी फौची यांनीही म्हटलं की, येत्या काही दिवसात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही डेल्टा व्हेरिअंटच्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त होईल.
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉन (Omicron) हा डेल्टापेक्षा (Delta) जास्त संसर्गजन्य असल्यानं जगात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अमेरिकेपासून (America) ते युरोपपर्यंत (Europe) ओमिक्रॉनच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ब्रिटनचे (Britain) आरोग्य मंत्री साजिद नावेद यांनी म्हटलं की, देशात ६० टक्क्यांहून अधिक नवे रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. अमेरिकेत व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार अँथनी फौची यांनीही म्हटलं की, येत्या काही दिवसात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही डेल्टा व्हेरिअंटच्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त होईल. दरम्यान, आता एका संशोधनातून सध्या कोरोनावर असलेल्या प्रतिबंधक लसी या ओमिक्रॉनविरोधात प्रभावी ठरत नसल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असल्यानं जगात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अमेरिकेपासून ते युरोपपर्यंत ओमिक्रॉनच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद नावेद यांनी म्हटलं की, देशात ६० टक्क्यांहून अधिक नवे रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. अमेरिकेत व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार अँथनी फौची यांनीही म्हटलं की, येत्या काही दिवसात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही डेल्टा व्हेरिअंटच्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त होईल. दरम्यान, आता एका संशोधनातून सध्या कोरोनावर असलेल्या प्रतिबंधक लसी या ओमिक्रॉनविरोधात प्रभावी ठरत नसल्याचं समोर आलं आहे.
अमेरिकन वृत्तपत्र युएस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षभरापासून वापरण्यात येणाऱ्या रेजेनॉर्न आणि इली लिलीच्या अँटिबॉडी ड्रग्जचा प्रभाव ओमिक्रॉन विरोधात दिसून येत नाही. दोन्ही कंपन्यांनी म्हटलं आहे की, सुरवातीच्या संशोधनात ओमिक्रॉनची बाधा झालेले रुग्ण या औषधांनी बरे होत नसल्याचं दिसत आहे. कोरोनाविरोधात कोणतंही औषध प्रभावी नसल्याचा दावा केला जात आहे. इतर आजारांमध्ये वापरण्यात येणारी औषधेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात होती. मात्र आता अनेक कंपन्यांनी औषधं प्रभावी नसल्याचं सांगितलं आहे.
औषध कंपन्यांनी म्हटलं की,'ओमिक्रॉनशी लढण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करावा यावर सध्या संशोधन सुरु आहे. मात्र अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो.' ओमिक्रॉन हा वेगाने म्युटेशन होणार व्हेरिअंट आहे. याला ट्रॅक करणं थोडंसं कठीण आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउथवेस्टर्न मेडिकल सेंटरचे डॉक्टर जेम्स कॅटरेल यांनी म्हटलं की, जर आपल्याकडं अँटिबॉडीची कमतरता असेल तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ८९ देशांमध्ये ओमिक्रॉन पसरला आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्हेरिअंट दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुप्पट वेगाने वाढत आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ९० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. देशात लॉकडाऊनची चर्चा सुरु आहे.
अमेरिकेत नवा व्हेरिअंट वेगाने पसरत आहे. यामध्ये दुसऱ्या लाटेत ज्या भागाला तडाखा बसला होता तिथे सर्वाधिक धोका आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेत एका दिवसात दोन लाख मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ४५ टक्के वाढ झाली, तर नव्या रुग्णांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाली. न्यूयॉर्कमध्ये शनिवारी २२ हजार कोरोना रुग्ण आढळले. तर गेल्या मंगळवारी अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूची संख्या ८ लाखांच्यावर पोहोचली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.