Laptop Blast In American Airlines Esakal
ग्लोबल

American Airlines Blast: अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये लॅपटॉपचा स्फोट, पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

आशुतोष मसगौंडे

अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर मियामीला जाणाऱ्या विमानात प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेला लॅपटॉप फुटला आणि धूर निघू लागल्याने एकच खळबळ उडाली.

वास्तविक, अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपमधून अचानक धूर येऊ लागला, त्यानंतर विमान रिकामे करावे लागले.

अमेरिकन एअरलाइन्सने माहिती देताना सांगितले की, प्रवासी विमानात चढत असताना क्रू मेंबरने लॅपटॉपमधून धूर येत असल्याचे पाहिले. याची माहिती मिळताच विमानात गोंधळ उडाला. अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक 2045 दुपारी 12:15 वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून मियामीसाठी रवाना होणार होते.

प्रवासी फ्लाइटमध्ये चढताच त्याच्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपचा स्पार्क होऊन स्फोट झाला. बॅगेतून धूर निघू लागला, जे पाहून क्रू मेंबर्सला धक्काच बसला. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीती पसरली. त्यानंतर प्रवाशाने घाईघाईने बॅग विमानाबाहेर फेकली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ती ताब्यात घेतली.

दरम्यान या अपघातात तीन प्रवासी भाजले असून, त्यांच्यावर तातडीने विमानतळावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. प्रवाशांना उतरवल्यानंतर विमानाच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेण्यात आली. ज्या व्यक्तीच्या लॅपटॉपला आग लागली त्या व्यक्तीलाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

सध्या सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या विमानाने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झाला. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये चढत असताना लॅपटॉपला आग लागली. फ्लाइट 2045 हे सॅन फ्रान्सिस्कोहून मियामीला जाणार होते, पण उड्डाण करण्यापूर्वी विमानतळावर अपघात झाला. प्रवासी फ्लाइटमध्ये चढत असताना कॅरी ऑन बॅगमध्ये ठेवलेल्या लॅपटॉपमधून धूर येऊ लागला.

अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 2045 सॅन फ्रान्सिस्को ते मियामी शुक्रवारी दुपारी स्लाइड्स आणि जेटब्रिजचा वापर करून रिकामे करावे लागले.

दरम्यान प्रवाशांना वाचवताना ३ जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

या घटनेमुळे एअरबस A321 विमानाचे काही नुकसान झाले आहे का, याचा तपास सुरू आहे. विमान कंपनीच्या क्रू मेंबर्सनी शहाणपणा दाखवत प्रवाशांचे प्राण वाचवले, त्याबद्दल विमान कंपनी आणि प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त केले. एअरलाइनने आपल्या ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT