भारतीय वंशाचा रोहित हा अॅमेझॉनचा माजी कर्मचारी होता.
वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियातील एका न्यायालयानं भारतीय वंशाच्या अमेरिकन (American) नागरिकाला फसवणूक केल्याप्रकरणी 10 महिन्यांचा तुरुंगवास आणि 50 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचा रोहित कादिमिसेट्टी (Rohit Kadimisetty) हा अॅमेझॉनचा माजी कर्मचारी होता. त्यानं ऑनलाइन (Amazon) ई-कॉमर्स कंपनीसोबत फसवणूक केली, गोपनीय माहिती चोरली आणि लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॅलिफोर्नियातील नॉर्थरिज (California's Northridge) कोर्टाच्या न्याय विभागानं (डीओजे) एक नोटीस जारी केलीय. त्यात म्हंटलंय की, रोहित कादिमिसेट्टीला सप्टेंबर 2021 मध्ये या कटासाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. रोहित सप्टेंबर 2020 मध्ये ऑनलाइन मार्केटप्लेसच्या 6 सल्लागारांपैकी एक होता. त्यानं कंपनीची फसवणूक केली आणि लाच घेतलीय. Amazon Marketplace हा एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, जो तृतीय पक्ष विक्रेत्यांद्वारे नवीन किंवा वापरलेली उत्पादनं विशिष्ट किमतीला विकण्यासाठी वापरला जातो, असं नमूद केलंय.
अमेरिकेचे वकील निक ब्राउन यांनी शुक्रवारी जाहीर केलं की, कादिमिसेट्टीला 10 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. यासोबतच त्याला US$ 50,000 चा दंड भरावा लागणार आहे. यूएस अॅटर्नीनं सांगितलं की, अॅमेझॉन कर्मचारी म्हणून काम करत असताना रोहितनं कंपनीची गोपनीय माहिती चोरली आणि अॅमेझॉन मार्केटप्लेसमध्ये फेरफार करण्यासाठी लाच घेतली, असा त्यांचा आरोप आहे.
रोहितला शिक्षा सुनावताना अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश रिचर्ड ए जोन्स म्हणाले, तुमच्याकडं अॅमेझॉनवरून चोरी करण्याचा परवाना नाही. तुम्ही अनेक बेकायदेशीर गोष्टी केल्या. त्यामुळं तुमचा गुन्हा गुन्हेगारीच्या श्रेणीत येतो, असं ते म्हणाले. अॅटर्नी ब्राउन यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, रोहितनं बेकायदेशीरपणे पैसे कमवण्यासाठी अॅमेझॉन मार्केटप्लेसवरील सूचीमध्ये फेरफार केली आणि त्यासाठी त्यानं अॅमेझॉनच्या माजी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला व सहकार्य घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन मार्केटप्लेसवर काही व्यापाऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी रोहितनं 2017 मध्ये लाच घेतली आणि कंपनीची फसवणूक केलीय, असं त्यांचं म्हणणं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.