पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले चार दिवस अमेरिका दौऱ्यावर होते. शुक्रवारी त्यांच्या या दौऱ्याची सांगता झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका मॅरी मिलबेन यांनी भारताचं राष्ट्रगीत गायलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पाया पडून त्यांचं अभिवादन केलं.
पंतप्रधान मोदींसाठीच्या या कार्यक्रमात गायला मिळालं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं मॅरी यावेळी म्हणाल्या. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मॅरी मिलबेन (Mary Millben) या ३८ वर्षांच्या गायिका भारतातही प्रसिद्ध आहेत. त्यांनी गायलेलं 'ओम जय जगदीश हरे' हे गाणं लाखो भारतीयांनी ऐकलं आहे. मॅरी यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमातही सहभाग नोंदवला होता.
मिलबेन यावेळी म्हणाल्या, की पंतप्रधान मोदी आणि भारतीयांना मी माझे कुटुंब मानते. त्यामुळे, भारताचं राष्ट्रगीत गायला मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अमेरिका आणि भारताची राष्ट्रगीते लोकशाही आणि स्वातंत्र्याबद्दल भाष्य करतात. अमेरिका आणि भारताच्या संबंधांचे हे सार आहे. एका स्वतंत्र देशाची ओळख ही तेथील स्वतंत्र लोकांमुळेच असते.
मोदींचा जगात डंका
यापूर्वी पंतप्रधान मोदी जेव्हा पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर होते, तेव्हा तेथील पंतप्रधान जेम्स मारापे यांनीदेखील त्यांचे आशीर्वाद घेतले होते. जेम्स यांनी पंतप्रधानांच्या पाया पडतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.