Americas intelligence agency CIA found out Zawahiris safe house in Kabul 
ग्लोबल

संयम अन् चिकाटीचे ‘सीआयए’ला फळ

जवाहिरीचे काबूलमधील सुरक्षित घर हुडकून काढले

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - सीआयए या अमेरिकेच्या जगविख्यात गुप्तचर संस्थेने अयमान अल जवाहिरी लपून बसला ते काबूलमधील सुरक्षित घर शोधून काढताना संयम आणि चिकाटी पणास लावली. अध्यक्ष बायडेन अधिकृत घोषणा करेपर्यंत जवाहिरी पाकिस्तानमधील आदिवासी भागात किंवा अफगाणिस्तानमध्ये असल्याची चर्चा होती. त्याचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरु होते. त्याला पाठिंबा देणारे नेटवर्क असल्याची अमेरिकी सरकारला कल्पना होती. अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेतल्यानंतर अमेरिकी अधिकारी अल कायदाचे तेथील अस्तित्व शोधण्यासाठी काळजीपूर्वक तपास करीत होते.

जवाहिरी, पत्नी, मुलगी आणि मुलीच्या मुलांसह काबूलमध्ये राहात असल्याची माहिती या वर्षात मिळाली. जवाहिरीला अचूक ओळखण्यात सीआयएला यश आले. त्यासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र सूत्रांचा वापर करण्यात आला. त्यातून खातरजमा झाल्यानंतर एप्रिलच्या अखेरपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवन यांनी अध्यक्ष बायडेन यांना कल्पना दिली. जवाहिरी काबूलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने हे शहर सोडले असल्याची माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे त्याला घरातील बाल्कनीत ओळखून आणि त्यानंतर हल्ला करून मोहीम फत्ते करण्यात आली.

सीआयएची दक्षता

  • जवाहिरी लपलेल्या घराच्या बांधकामाचे स्वरूप जाणून घेतले

  • त्यात राहणाऱ्या व्यक्तींच्या माहितीची काटेकोर छाननी

  • इमारतीला धोका होणार नाही अशा पद्धतीने हल्ला

अमेरिकेच्या लाडक्या क्षेपणास्त्राचा वापर

शी तयुद्धाच्या कालावधीत सोव्हिएत महासंघाच्या अजस्त्र रणगाड्यांना शह देता यावा म्हणून अमेरिकेने विकसित केलेले क्षेपणास्त्र जवाहिरीचा खातमा करण्यासाठी वापरण्यात आले. हेलफायर असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. सोव्हिएत महासंघासारख्या कट्टर शत्रूविरुद्ध वापरण्यात आलेले हे हेलफायर अमेरिकेचे लाडके क्षेपणास्त्र मानले जाते.

याचा इतिहास तसेच वैशिष्ट्ये अशी ः

  • लढाऊ हेलिकॉप्टरमधून एकदाच डागता येईल असे क्षेपणास्त्र बनविण्याची विनंती लष्कराने केल्यानंतर १९७४ मध्ये लष्कराच्या तज्ज्ञ आणि संशोधकांकडून विकसित

  • शत्रूवर थेट हल्ला करण्यापासून खंदक उद्ध्वस्त करणे अशा विविध कारणांसाठी वापर

  • लेझरवर चालणाऱ्या यंत्रणेद्वारे लक्ष्य टिपण्याची क्षमता

  • काळाच्या ओघात दिशा, भेदकता आणि सुरक्षितता अधिकाधिक सरस बनली

  • आधीच्या प्रकारांत उंचावर दिशा बदलण्याची क्षमता कमी, त्यासाठी लेझर यंत्रणेवर अवलंबून असलेल्या क्षेपणास्त्रात नंतर रडार यंत्रणेचा वापर, त्यामुळे डागल्यानंतर दिशेबाबत लवचिकतेचा फायदा

  • नव्या प्रकारांमध्ये विमानामागे लपलेल्या शत्रूचाही खातमा करण्याची क्षमता

  • १९९१ मध्ये इराकविरुद्धच्या आखातामधील युद्धात तब्बल ५०० रणगाड्यांचा नाश

सौदीकडून स्वागत

सौदी अरेबियाने अमेरिकेच्या कारवाईचे स्वागत केले. अमेरिका, सौदी अरेबिया तसेच जगातील इतर अनेक देशांमध्ये अत्यंत दुष्ट कारवाया करण्याचा कट आखणाऱ्या तसेच तो अमलात आणणाऱ्या दहशतवाद्यांचा तो म्होरक्या मानला जायचा. सौदीसह वेगवेगळ्या देशांचे आणि धर्मांचे हजारो निरपराध नागरिक यांत मारले गेले, असे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचा एक सूत्रधार आणि ओसामा बिन लादेननंतर अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी हा अखेर २० वर्षांनंतर मारला गेला. अफगाणिस्तानमध्ये युद्ध न करताही दहशतवादाचा सामना करता येतो, हे जवाहिरीच्या मृत्यूने सिद्ध झाले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, गुप्तचर विभाग आणि कोणत्याही निरपराधाला इजा पोहोचू न देता जवाहिरीला टिपणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाला याचे श्रेय जाते. ९/११ तील पीडित कुटुंबीयांना आणि अल कायदामुळे छळ भोगावा लागणाऱ्यांना थोडी तरी शांतता लाभेल.

- बराक ओबामा, माजी अध्यक्ष, अमेरिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT