America's interference in indian elections Esakal
ग्लोबल

Loksabha Election: भारताच्या निवडणुकीत अमेरिका खरंच हस्तक्षेप करत आहे का? वाचा, रशियाच्या आरोपावर अमेरिकेने काय दिले उत्तर

US And Indian Elections: परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय भारतातील जनतेला घ्यायचा आहे.

आशुतोष मसगौंडे

भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेरिका हस्तक्षेप करत असल्याचा आरोप रशियाने केला होता. मात्र, अमेरिकेने रशियाचा हा आरोप फेटाळून लावला आहे. यावेळी अमेरिकेने म्हटले की, ते जगातील कोणत्याही निवडणुकीत हस्तक्षेप करत नाहीत. परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय भारतातील जनतेला घ्यायचा आहे.

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आमचा भारतातील निवडणुकांमध्ये कोणताही सहभाग नाही, कारण आम्ही जगात कोठेही निवडणुकांमध्ये स्वतःला सहभागी होत नाही. याचा निर्णय भारतातील जनतेला घ्यायचा आहे. (America's interference in indian elections)

दरम्यान भारतामध्ये सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेरिका हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रशियाने केला होता.

अमेरिका भारताच्या अंतर्गत राजकारणात असंतुलन करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही रशियाने म्हटलं आहे. भारतातील सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले असताना रशियाकडून हे आरोप करण्यात आले आहेत. मतदानाचे आणखी चार टप्पे बाकी आहे.

यावेळी रशियाने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या प्रकरणावरही भाष्य केले आहे. पन्नूच्या कथित हत्येच्या कटात भारतीय गुप्तचर अधिकारी सामील असल्याचा अमेरिकेचा आरोप रशियाने निराधार असल्याचे म्हटले आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने या प्रकरणात भारतीय नागरिकांच्या सहभागाचा कोणताही विश्वासार्ह पुरावा अद्याप सादर केलेला नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारताच्या धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिका सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहे, असे मारिया झाखारोवा म्हणाल्या होत्या. भारतातील अंतर्गत राजकीय परिस्थिती बिघडवणे आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे.

झाखारोवा पुढे म्हणाल्या की, अमेरिकेच्या कारवाया भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT