आकेडवारीच्या सरासरीची अचूकता अन् दुष्परिणाम अनुत्तरित असल्याचे विविध तज्ज्ञांचे मत
लंडन - जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या साथीत संशोधन झालेल्या ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या कोरोनावरील लशीमुळे सात प्रश्न आणि अनेक उपप्रश्न निर्माण झाले आहेत. यात आकेडवारीच्या सरासरीची अचूकता आणि दुष्परिणाम अनुत्तरीत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी प्रयोगशाळेतील चाचण्यांत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या संख्येपासून प्रश्न उपस्थित केले आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जगभरातील नियामकांना चाचण्यांची आकडेवारी लवकरच सादर केली जाईल असे ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. वेगवेगळ्या दोन गटांची अनुक्रमे 62 आणि 90 टक्के अशी अचूकता सरासरी 70 टक्के परिणामकारकता दर्शविते, पण त्यात अनेक प्रश्न दडले आहेत.
- दोन किंचित वेगळ्या चाचण्यांच्या सरासरीवरून परिणामकारकता निश्चित
- डोसची संख्या - दोन
- कमी संख्येच्या गटाला आधी अर्धा डोस, मग महिन्याने पूर्ण डोस
- दुसऱ्या मोठ्या गटाला दोन पूर्ण डोस
- पहिल्या गटात परिणामकारकता ९० टक्के, ज्यात २,७०० स्वयंसेवक
- दुसऱ्या गटात ६२ टक्के परिणामकारकता, ८,९०० स्वयंसेवक सहभागी
- आकडेवारीतील अशा तफावतीमुळे ॲस्ट्राझेनेका वापर दोन पद्धतीने करीत असल्याचे स्पष्ट, त्यासाठी वेगळी मंजुरी घेण्याची शक्यता
- कोणत्या पद्धतीची निवड होणार ?
- प्रयोगशाळेतील नव्या चाचण्यांना किती काळ लागणार ?
- त्यामधील आकडेवारीनुसार डोसच्या स्वरूपात बदल होणार की सरासरी आढावा घेण्याची पद्धत कायम राहणार ?
- अर्धा डोस देण्यामागे चूक कारणीभूत ठरल्याची आणि पहिल्या डोसच्या दुष्परीणामांची कारणमीमांसा होईपर्यंत हे लक्षात न आल्याची मेने पँगालोस यांची रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत कबुली
- पँगालोस हे आवाळूशास्त्र सोडून इतर विषयांतील संशोधन-विकास प्रमुख
- यानंतरही कंपनीकडून चाचण्या पुढे नेण्याचा निर्णय, जेणेकरून दुसरा डोस दिला जावा हा उद्देश
- ही चूक झाली असल्यास ती कधी आणि का झाली ?
- संशोधनात अशी इतर एखादी चूक झाली का हे तपासण्यासाठी ॲस्ट्राझेनेका प्रयोगशाळांतील चाचण्यांच्या अहवालाची पुन्हा तपासणी करणार का ?
तज्ञाचे मत प्रतिकूल - जेफ्री पॉर्जेस
यासंदर्भात समीक्षक जेफ्री पोर्जेस यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. अमेरिकेतील बोस्टनमध्ये मुख्यालय असलेल्या एसव्हीबी लिरींक या आरोग्यसेवा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या बँकेचे ते समीक्षक आहेत. ते म्हणाले की, डोसचे स्वरूप, विशिष्ट लोकसंख्येतील एकाच सुमारास जन्मलेला वयोगट किंवा इतर निकष यांपैकी कशामध्येही चाचण्यांच्या मध्येच कोणताही बदल चुकून किंवा हेतुपुरस्सर झाला असल्यास अमेरिकी अन्न-औषध प्रशासन त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघेल असे मला वाटत नाही.
- ॲस्ट्राझेनेकाचे सर्वांधिक गोंधळात टाकणारे विधान अर्ध्या डोसच्या पद्धतीशी संबंधित
- दोन पूर्ण डोसच्या पद्धतीच्या जास्त परिणामकारकता आढळल्याने हे उघड
- डोसचे प्रमाण जास्त असल्यास प्रतिकारशक्तीही जास्त निर्माण होत असल्यामुळे अशी आकडेवारी अनेक तज्ज्ञांसाठी आश्चर्यकारक
- यानंतरही संशोधक तफावती बाबत स्पष्टीकरण देण्यास असमर्थ
- या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे डोस परिणामकारक ठरतात ते कसे घडते हे नक्की माहीत नसताना ॲस्ट्राझेनेकाने लशीसाठी मंजुरी मिळवणे योग्य आहे का ?
ॲस्ट्राझेनेकाकडे पूर्ण उत्तर...
ॲस्ट्राझेनेकाच्या संशोधन कार्यात ऑक्सफर्ड विद्यापीठचाही सहभाग होता. या विद्यापीठाच्या लससंशोधनशास्त्राच्या प्राध्यापिका सारा गिल्बर्ट यांनी ॲस्ट्राझेनेकाच्या तज्ज्ञांच्या साथीत या प्रक्रियेत भाग घेतला. त्यांनी सांगितले की, ही आकडेवारी माझ्यासाठी आश्चर्यकारक ठरली आहे. याबाबतचे पूर्ण उत्तर कंपनीकडे आहे का, याची मला खात्री नाही. आणखी काही निकषांवर तपासणी होण्याची गरज मला वाटते.
आकडेवारी दडवण्याचा प्रकार ? - मॉन्सेफ स्लाऔ
- विलक्षण परिणामकारक ठरलेल्या अर्ध्या डोसच्या पद्धतीबाबत एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत
- त्यानुसार या पद्धतीमधील सहभागी स्वयंसेवक ५५ वर्षांच्या आतील, तर पूर्ण डोसच्या पद्धतीमधील स्वयंसेवक तुलनेने बुजुर्ग
- ऑपरेशन वार्प सिडचे (ओडब्लूएस) प्रमुख मोन्सेफ स्लाऔ यांची माहिती
- कोविड-१९ लशींचे संशोधन, उत्पादन आणि वितरण त्वरेने व्हावे यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वानुसार अमेरिका सरकारकडून ओडब्लूएसची स्थापना
- यानंतरही ॲस्ट्राझेनकाकडून प्रसिद्धी पत्रकात असे तपशील नाहीत
- खरी असल्यास ही माहिती उघड का केली नाही
- खोटी असल्यास माहितीचे खंडन का केले नाही
- लोकसंख्याशास्त्रानुसार चाचणीतील सहभागी स्वयंसेवकांमध्ये फरक होता का
- प्रकृतीची स्थिती अशा किंवा इतर एखाद्या निकषानुसार काही फरक होता का
- चाचण्यांसाठी सुमारे २३ हजार स्वयंसेवकांची नोंदणी
- सहभागी झालेल्यांची ११ हजार संख्या जेमतेम निम्मीही नाही
- त्यातच अर्ध्या डोसच्या पद्धतीमधील सहभागी स्वयंसेवकांची संख्या केवळ ३०००
- या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी मानण्यासाठी ही आकडेवारीच अपुरी
- सहभागी स्वयंसेवकांमधील कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा केवळ १३१
- कोणताही डोस घेतलेल्या स्वयंसेवकाला संसर्ग झाला का याबाबत मात्र माहिती उघड नाही
- ॲस्ट्राझेनेका अतिरिक्त आकडेवारी जाहीर करणार का?
- खास करून अर्ध्या डोसच्या पद्धतीची परिणामकारता सिद्ध करण्यासाठी कंपनी नव्याने चाचण्या सुरू करणार का?
दुष्परिणामांबाबत स्पष्टीकरण नाही ?
- ब्रिटनमधील चाचण्या काही काळासाठी स्थगित
- प्रतिकारशक्ती निर्माण करणारी यंत्रणाच चुकून शरीरावर हल्ला करणारे विषाणू निर्माण करते अशा विकाराची दोन उदाहरणे मिळाल्याची शक्यता
- किमान एका स्वयंसेवकाच्या पाठीच्या कणाला गंभीर सूज येण्याचा त्रास
- या विकारास ट्रान्सव्हर्स मायएलीटीस असे संबोधले जाते
- संबंधित स्वयंसेवक नंतर बरा झाल्यामुळे चाचण्या पुढे सुरू
- दुष्परिणामांच्या अशा प्रकारांबाबत कंपनीकडून कोणतेही भरीव स्पष्टीकरण नाही
- दुष्परीणामांची माहिती लवकरात लवकर जाहीर होणार का?
जबाबदारी टाळण्याचा प्रकार?
- आकडेवारीत तफावत असली तरी लसपुरवठा करार केलेल्या बहुतेक देशांबरोबर कंपनीकडून पूर्ण भरपाईची खबरदारी
- हे करार जुलैमध्ये होत असताना मात्र गोंधळून टाकणारी आकडेवारी समोर आली नव्हती
- आता कंपनी भूमिका बदलणार का आणि चाचण्यांमधील स्वतःच्या चुकीमुळे एखाद्या प्रकारचे नुकसान झाल्यास कायदेशीर धोके पत्करण्यास तयार होणार का हा महत्त्वाचा मुद्दा
- लशीच्या सुरक्षिततेबाबत कोणताही दिर्घकालीन अभ्यास झाला नसल्यामुळे हा मुद्दा जास्त चिंतेचा
- लशीच्या दिर्घकालीन परिणामांचा अभ्यास केव्हा होणार
- ही आकडेवारी केव्हा जाहीर केली जाणार
ही अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. एक कंपनी म्हणून आम्ही अजिबात धोका पत्करू शकत नाही. लशीचे दुष्परिणाम नेहमीच दिसले आहेत.
- रुड डॉबर, ॲस्ट्राझेनेका वरिष्ठ कार्यकारिणी सदस्य
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.