gun of watchman stolen in yavatmal  
ग्लोबल

अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना; तिघांचा मृत्यू, ११ जखमी

आठवड्याभरात घडली दुसरी गोळीबाराची घटना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अमेरिकेत शस्त्र परवाना संबंधीच्या धोरणाचे अत्यंत गंभीर परिणाम दिसून येत आहेत. वारंवार सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तीन दिवसापूर्वी येथील ओक्लाहोमा इथं हॉस्पिटलच्या आवारात तरुणानं गोळीबार केला होता. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा गोळीबार झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (at least three dead 11 injured in a shooting incident in Philadelphia US)

अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आज (५ जून) पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत, यामध्ये आजवर अनेक निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान, २ जून रोजी ओक्लाहोमा येथील सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या आवारात गोळीबार झाला होता, यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. या गोळीबारात शूटरसह चार जण ठार झाल्याचं तुलसा पोलिसांनी सांगितलं. मेडिकल कॅम्पसमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रायफल असलेल्या एका व्यक्तीनं गोळीबार केल्याचा पोलिसांना फोन आला होता. त्यानंतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. यामध्ये एका जोडप्याचाही मृत्यू झाला होता.

या घटनेच्या काही दिवसांपूर्वी पार्किंगच्या वादातून अमेरिकेत गोळीबार झाला होता. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. तर, दोन जण जखमी झाले होते. याशिवाय टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या या घटनेनं संपूर्ण जग हादरलं होतं. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT