Indian students strandened in Ukraine 
ग्लोबल

युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला; बंदुकधारी पोलिसांकडून मारहाण

युक्रेन-रशिया युद्धामध्ये भारताच्या कथीत भूमिकेवरुन हा प्रकार घडल्याचं या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : युक्रेन-पोलंड सीमेवर (Ukraine-Poland Border) भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या या विद्यार्थ्यांना बंदुकधारी पोलिसांकडून अडवण्यात आलं तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांसोबत अडकून पडलेली ठाण्याची साक्षी इजंतकर (Sakshi Ejantkar) या मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनं एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून आपल्यावरील आपबिती सांगितल्यानंतर इथली भीषण परिस्थिती समोर आली आहे. त्याचबरोबर युक्रेन-हंगेरी सीमेवरही विद्यार्थी गेल्या अनेक तासांपासून अडकून पडले आहेत. (attacks on Indian students on border with Ukraine Beaten up by police with guns)

युक्रेन-पोलंड सीमेवर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

ठाणेकर अर्थात मराठी विद्यार्थीनी साक्षी इजंतकरनं सांगितलं की, "आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा सुरक्षा रक्षकांनी आम्हाला घेरलं होतं. आम्हाला एन्ट्री पॉईंटवर जाण्यापासून रोखण्यात आलं. युक्रेनचे नागरिक खूपच भेदभावपूर्ण वागत होते. याठिकाणाहून केवळ युक्रेनच्या लोकांनाच सीमापार जाऊ दिलं जात होतं. आम्ही बराच काळ त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी आधी फक्त भारतीय मुलींना जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर तिथं बंदुकाधारी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी भारतीय मुलांना खूप मारलं. त्यानंतर त्यांनी या मुलांचा इतका छळ केला की एका मुलाला अस्थमाचा त्रास होता त्याला मारहाणीदरम्यान श्वास घ्यायला कसा त्रास होतोय हे ते सांगत होते. त्यानंतर रात्री ११ ते १२ वाजता या मुलांना प्रवेश देण्यात आला. या सर्व प्रकारामुळं आम्ही खूपच जास्त घाबरलो होतो. यानंतर इथं जे सुरक्षा रक्षक होते त्यांना तीन रांगा हव्या होत्या पण आम्ही चार रांगा बनवल्यानं त्यांनी बंदुकांसह आम्हाला मारहाण केली. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तिथं व्हिसासंबंधी 'हंटर गेम' असं काहीसं सुरु होतं तिथं ते रॉड आणि बंदुका घेऊन उभे होते. तुम्हाला व्हिसा हवा असेल तर हा खेळ खेळावा लागेल अस त्यांच्याकडून सांगण्यात आलं. यावेळी देखील त्यांनी मुलगा-मुलगी काहीही न पाहता लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली"

युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांमधील एका विद्यार्थ्यानं व्हिडिओच्या माध्यमातून गुजराती भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानं सांगितलं की, "आम्हाला युक्रेनच्या लोकांकडून त्यांच्या देशाची सीमा ओलांड्यापासून रोखण्यात आलं. भारत कथीतरित्या रशियाच्या बाजूनं असल्यानं आमच्यावर हा हल्ला झाला आहे" या विद्यार्थ्यानं म्हटलं की, चाळीस किमीची पायपीट करुन रात्री आम्ही उणे १५ डिग्री सेल्सिअस तापमानात आम्ही युक्रेन-पोलंड सीमेवर पोहोचलो. या ठिकाणी येईपर्यंत आमच्या पायातील बूट-चप्पला देखील नव्हत्या. त्यामुळं सीमेवर थांबण्यासाठी आमची चांगली व्यवस्थाही नव्हती. आम्हाला सीमापार पोलंडमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. यावेळी बंदुकधारी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.

युक्रेन-हंगेरी सीमेवर विद्यार्थी हतबल

युक्रेन-हंगेरी सीमेवर देखील काही भारतीय विद्यार्थी पोहोचले असून ते अक्षरशः हतबल झाले आहेत. रडून एका विद्यार्थ्यानं आपल्यावरील अडचणीचा पाढा वाचला. त्यानं म्हटलं की, "युक्रेन-हंगेरी सीमेवर गेल्या दहा तासांपासून आम्ही अडकून पडलो आहेत. पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला इथं विचारायला आलं नाही. स्वतःला आम्ही अजून किती काळ सांभाळायचं आमच्या ज्युनिअर विद्यार्थ्यांना किती काळ सांभाळायचं? असा सवालही या विद्यार्थ्यानं केला आहे. आम्ही आता खूपच वैतागलो आहोत यापेक्षा आम्ही मेलो असतो, एखादं क्षेपणास्त्र आमच्यावर येऊन पडलं असतं तर बरं झालं असतं. इथं आमचे आई-बाप नाहीत, कोणीही नाही. केवळ असं सांगितलं जातंय की, तुमच्यासाठी इथं अधिकारी उभे आहेत. पण इथं कोणीही आमच्यासाठी नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT