Attacks on Israel sakal
ग्लोबल

Israel Attack : इस्त्राईलवरील हल्ल्यांचा महिला, मुलांवर मानसिक धक्का

इस्त्राईलवरील झालेल्या भिषण हल्ल्याला ४८ पेक्षा जास्त तास उलटून गेलेत मात्र सामान्य इस्त्राईली नागरिकांच्या मनातील भितीचे सावट अजूनही कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - इस्त्राईलवरील झालेल्या भिषण हल्ल्याला ४८ पेक्षा जास्त तास उलटून गेलेत मात्र सामान्य इस्त्राईली नागरिकांच्या मनातील भितीचे सावट अजूनही कायम आहे. १९७३ त्या अरब युध्दानंतर इस्त्राईलवरच्या भूमीवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो.

यावेळी मोठ्या प्रमाणात ज्यू कुटुंबाचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे याचा सर्वात मोठा धक्का महिला, जेष्ठ नागरिक आणि आणि लहान मुलांवर बसल्याचे सांगण्यात येत आहे.

गाझा पट्टीलगतच्या इस्त्राईलच्या सिमेत 'हमास' या संघटनेचे हल्ले काही नवे नाही. मात्र यावेळचा हल्ला अभूतपुर्व होता असे लेबाना पेनकर यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. लेबाना या इंडियन ज्यूईश फेडरेशनच्या आणि राष्ट्रकूल ज्युईश महिला नेटवर्कच्या सक्रीय सदस्य आहेत.या हल्यानंतर त्या सातत्याने सर्वांशी संपर्कात आहे.

हमासचे दहशतवाद्यांनी यावेळी पहिल्यांदा त्यानी इस्त्राईलच्या नागरी वस्त्यांना टार्गेट केले. इस्त्राईल लष्करी वेशात ते नागरी वस्त्यांमध्ये घुसले. हमासचे दहशतवादी असे करु शकतात हे ध्यानीमनी नसणाऱ्या सामान्य नागरिकांनी दरवाजे उघडले. त्यानंतर अनेक महिला, लहान मुलांना हमासच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवून गाझा पट्टीत आपल्यासोबत नेले. आतापर्यंत हमासने अनेकदा असे हल्ले केले आहे.

मात्र पहिल्यांदा सामान्य नागरिकांवर त्यांनी हल्ला केला. हा एक मोठा धक्का असल्याचे लेबाना सांगतात. अपहरण करण्यात आलेल्यांमध्ये अगदी ९० वर्षाच्या आजी, आजोबांचा समावेश आहे. या सर्वांची सुटका करणे.या मानसिक धक्यातून बाहेर पडणे आव्हात्मक असल्याचे त्या म्हणाल्या.

इस्त्राईलमध्ये अंदाचे ८५ हजारापेक्षा जास्त भारतीय वंशाचे ज्यू नागरिक राहतात. १९५० आणि १९६० मध्ये भारतातून इस्त्राईलला गेले. यामध्ये सर्वाधिक संख्या मराठी ज्यू म्हणजेच बेने इस्राईल नागरिकांची आहे. त्यानंतर केरळ (कोचीन ज्यू), कोलकात्ता (बगदादी ज्यू)ची संख्या आहे. यातील जुन्या पीढीने भारतासोबतचे नाते टिकवून ठेवले आहे.

मात्र नवी पीढी इस्त्राईल समाजात एकरुप झाली आहे. यावेळी हल्ला झालेल्या दक्षिण इस्त्राईलमधील शहरात मराठी ज्यू फारशे राहत नाही. मराठी ज्यू आता प्रस्थापित झाले असून ते मुख्य शहरात राहत आहेत. त्यामुळे या हल्यात भारतीय वंशाच्या ज्यू सुरक्षित राहील्याचे लेबाना यांनी सांगीतले.

भारतीय ज्यू हे भारताला मातृभूमी आणि इस्त्राइलला पितृभूमी मानतात. सर्वजगातून या हल्लाचा निषेध होत आहे. या कठिण समयी आम्ही सर्वजण इस्त्राईलच्या पाठीशी ऊभे आहोत.

- लेबाना पेनकर, इंडियन ज्यूईश फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT