Israel  
ग्लोबल

घटस्फोट पडला महागात... 8000 वर्षांसाठी देश सोडण्यावर बंदी

ओमकार वाबळे

जगभरात वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्याचं तुम्ही ऐकलं असेल. आजन्म कारावास किंवा मरेपर्यंत फाशी असे शब्द आपण ऐकत असतो. पण इस्राईलमध्ये एका शिक्षेनंतर सगळीकडे त्याची चर्चा रंगली आहे. कारण एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीवर 8000 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

2013 पासून एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती इस्रायलमध्ये वास्तव्यास आहे. त्याचं लग्न झालं होतं. मात्र घटस्फोटाच्या प्रकरणात त्याला स्थानिक कोर्टाने अशी शिक्षा सुनावली की, त्यामुळे या व्यक्तीला सुट्ट्यांसाठीही देश सोडून जाता येणार नाही. या व्यक्तीविरोधात 'स्टे-ऑफ-एक्झिट' जारी करण्यात आला आहे.

इस्रायलमध्ये अडकलेल्या या ऑस्ट्रेलियन नागरिकाचं म्हणणं आहे की, संबंधित कायद्याची माहिती नसल्याने त्याला बळी पडणाऱ्या हजारो परदेशी पुरुषांना याचा त्रास झाला आहे. आणि या पुरुषांपैकी तो एक आहे. नोअम हप्पर्ट (Noam Huppert) हे 44 वर्षांचे आहे. त्यांना 9999 मधील 31 डिसेंबरपर्यंत देश सोडण्यापासून अधिकृतपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. हा नियम मोडल्यास त्यांना बाल भविष्य समर्थन निधीत तीस लाख डॉलर्स इतकी रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला होता. 8000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा - किंवा जोपर्यंत तो भविष्यातील बाल समर्थन पेमेंटमध्ये $3 दशलक्षपेक्षा जास्त रक्कम देत नाही तोपर्यंत त्याला इस्रायलमध्येच राहावं लागणार आहे.

स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीनुसार हुपर्ट 2012 मध्ये आपल्या दोन लहान मुलांसोबत राहण्यासाठी इस्राईलला गेले. यावेळी त्यांची पत्नी तीन महिने आधीच देशात माघारी आली होती. तिने परत येताच इस्रायलच्या कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. यामध्ये दोनही मुलांचा खर्च त्यांना उचलायचा आहे. मुलं 18 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या संगोपनाची आर्थिक जबाबदारी ह्युपर्ट यांची असेल.

इस्रायलमधील कायद्यानुसार एखादी मुलगी तिच्या वडिलांवर सहजपणे प्रवास बंदी घालू शकते. बाल समर्थनाच्या मागणीसाठी ही कायद्यात तरतूद आहे. हा कालावधी बालकांच्या सज्ञान होईपर्यंत वाढू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT