saif-al-adel Sakal
ग्लोबल

PHOTOS : अल जवाहिरीनंतर 'हा' होणार अल-कायद्याचा म्होरक्या

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला.

सकाळ डिजिटल टीम

Al Qaeda Chief After Al Zawahiri Killed : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर अल-कायदाच्या नव्या प्रमुखाबाबत अटकळ बांधली जात आहे. अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर अल-कायदाचा उत्तराधिकारी म्हणून सैफ अल-अदेलचे नाव चर्चेत आहे. सैफअल अदेल हा पूर्णपणे लष्करी प्रशिक्षित कार्यकर्ता मानला जातो. जाणून घेऊया कोण आहे सैफअल अदेल.

सैफ अल आदेलचा जन्म 11 एप्रिल 1960 झाला असून, तो इजिप्तचा रहिवासी आहे.
1998 मध्ये नैरोबी येथील अमेरिकन दूतावास आणि दार-ए-सलाम येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आदेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.
सैफ अल आदेलने अल कायदाच्या दहशतवाद्यांना लष्करी आणि गुप्तचर प्रशिक्षण दिले आहे.ओसामा बिन लादेननंतर अल आदेलची हंगामी नेता म्हणून निवड झाली होती. त्यानंतर अल कायदाचा प्रमुख म्हणून अल-जवाहिरीची निवड करण्यात आली होती. आता जवाहिरीचा खात्या झाल्यानंतर अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून घोषित करण्यात आला आहे.
अमेरिकेकडून अल आदेलवर एक कोटी डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आले होते. अल आदेल अल-कायदाच्या मजलिस-ए-शूरा आणि लष्करी समितीचाही सदस्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT