नवी दिल्ली- बांगलादेशमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. शेख हसीना या भारतात येत असताना त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. भारताने या दाखवलेल्या उदारपणाबाबत शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय (Sajeeb Wazed ) यांनी आभार मानले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.
माझा भारत सरकारसाठी संदेश आहे. मी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो, कारण माझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी लवकर पाऊलं उचलली. त्याच्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानत, असं सजीब वाजेद म्हणाले आहेत. वाजेद हे सघ्या अमेरिकेमध्ये आहेत. याठिकाणी त्यांनी एएनआयशी संवाद साधला.
माझा दुसरा संदेश असा असेल की भारताने आता जागतिक पातळीवर नेतृत्व करावे. पश्चिमी देशांना परिस्थिती हातळण्याचा अधिकार देऊ नये. कारण, भारत हा आमचा शेजारी देश आहे. देशाचा हा पूर्व भाग आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशमध्ये शांतता आणली होती हे कोणीही नाकारू शकत नाही. आर्थिक प्रगती हसीना यांच्याच कार्यकाळात झाली, असं ते म्हणाले.
सजीब वाजेद यांनी शेख हसीना यांच्या बांगलादेशमध्ये परत जाण्याच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. शेखी हसीना हे परत बांगलादेशमध्ये जातील. त्या फक्त परिस्थिती शांत होण्याची वाट पाहात आहेत. त्या कोणत्याही देशात आश्रय घेणार नाही. त्यांच्या व्हिसा नाकारला या गोष्टी फक्त अफवा आहेत. त्यांनी कोणत्याही देशाकडे विनंती केली नाही. सध्या त्या भारतातमध्ये सुरक्षित आहेत, असं ते म्हणाले आहेत.
बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या अशांततेमध्ये अमेरिकेचा हात आहे असं मला वाटत नाही. कारण तशा पद्धतीचे पुरावे नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी तिथे शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.