ISKON Vandalised, Bangladesh 
ग्लोबल

बांगलादेश : जमावाकडून इस्कॉन मंदिरावर हल्ला, तीन भाविकांचा मृत्यू

दोनचं दिवसांपूर्वी बांगलादेशात दुर्गा मंदिरावर हल्ला झाला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ढाका : दुर्गा पूजेदरम्यान मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये इस्कॉन (कृष्ण) मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर भाविकांवरही जमावानं हल्ला केला आहे. बांगलादेशातील नोखाली जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलं. या हल्ल्यामध्ये मंदिराचं मोठं नुकसान झालं असून हल्ला झालेल्या भाविकांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर इस्कॉननं म्हटलं की, "इस्कॉन मंदीर आणि भविकांवर हिंसकपद्धतीनं हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये मंदिराचं मोठं नुकसान झालं असून भाविकांची प्रकृती गंभीर आहे. आम्ही बांगलादेश सरकारला आवाहन केलं आहे की, इथल्या हिंदुंची सुरक्षा निश्चित करा आणि गुन्हेगारांना शिक्षा द्या"

जवळपास २०० लोकांच्या जमावाकडून इस्कॉनचे सदस्य पार्थ दास यांची काल निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह एका छोट्या तळ्यात आढळून आला. या घटनेवर बांगलादेश सरकारनं तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणीही आम्ही केली असल्याचंही इस्कॉननं म्हटलं आहे.

इन्कॉन नॅशनल कम्युनिकेशनचे व्रजेंद्र नंदन दास म्हणाले, "ज्यांनी हल्ला केला ते गुंड किंवा दहशतवादी नव्हते, पण ते बहुसंख्यांकांमधील लोक होते. या हल्ल्यामध्ये आमच्या तीन भाविकांचा मृत्यू झाला. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी बांगलादेश सरकारनं योग्य कारवाई करावी"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT