Sheikh Hasina sakal
ग्लोबल

Sheikh Hasina: शेख हसीना यांना आपल्या देशात माघारी जावं लागणार? बांगलादेश सरकारने घेतला मोठा निर्णय

Bangladesh Government: हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशमध्ये त्यांच्याविरोधात खूनाच्या ४२ गुन्ह्यांसह एकूण ५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या गुन्हेगार हस्तांतर कायद्याअंतर्गतही हसीना यांना अटक करून बांगलादेशात पाठविण्यासारखी ही स्थिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

ढाका: बांगलादेशमधील हंगामी सरकारने देश सोडून पळून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द केला आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा व कुटुंबीयांचाही राजनैतिक पासपोर्ट रद्द केला आहे. या सर्वांना सामान्य पासपोर्ट मिळू शकतो. मात्र, त्यांनी तसा अर्ज करणे आवश्‍यक असून किमान दोन तपास संस्थांनी त्यांच्याबाबत सकारात्मक अहवाल देणे आवश्‍यक आहे.

हसीना या सध्या भारतात आहेत. भारताच्या व्हिसा धोरणानुसार, राजनैतिक पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीला भारतात व्हिसामुक्त प्रवेश असून ते ४५ दिवसांपर्यंत देशात राहू शकतात. हसीना यांना भारतात येऊन १८ दिवस झाले आहेत. हसीना यांच्याकडे राजनैतिक पासपोर्टव्यतिरिक्त दुसरा पासपोर्ट नाही आणि आता तोदेखील रद्द झाल्याने त्यांच्यावर माघारी पाठविले जाण्याची टांगती तलवार आहे.

हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशमध्ये त्यांच्याविरोधात खूनाच्या ४२ गुन्ह्यांसह एकूण ५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या गुन्हेगार हस्तांतर कायद्याअंतर्गतही हसीना यांना अटक करून बांगलादेशात पाठविण्यासारखी ही स्थिती आहे.

शेख हसीना यांनी जर त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट जमा केला नाही तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते. बांगलादेशामध्ये तीन प्रकारे पासपोर्ट अदा केले जातात. यामध्ये डिप्लोमॅटिक पासपोर्ट हा लाल रंगाच्या कव्हरमध्ये येतो. हा पासपोर्ट पंतप्रधान, राष्ट्रपती, राजकीय लोक, टॉप रँकिंगचे सरकारी अधिकारी, खासदार, मंत्री यांना दिला जातो. या पासपोर्टमुळे अनेक देशामध्ये व्हिसाशिवाय जाता येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT