इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मुक्त करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. पण खान यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. कारण त्यांची एक ताजी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून यामध्ये त्यांनी कोर्टाच्या घडामोडींवर तसेच पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांच्या निकालाबाबत चर्चा करताना दिसत आहेत. (Before SC order were movements for release of Imran Khan started Latest audio clip viral)
या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये इम्रान खान हे आपल्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या नेत्या मुस्सरत जमशेद चीमा यांच्याशी बोलत आहेत. त्यांच्या संभाषणात ते कोर्टात सुरु असलेल्या ताज्या घडामोडी आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांचा प्रतिसाद यावर चर्चा करताना ऐकायला मिळतात. इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारुख यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही कारण ते पाकिस्तान लष्कराच्या आदेशानं काम करत आहेत. त्यामुळं वकिलांशी चर्चा करुन त्यांना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला सांगा असे आदेश चीमा यांना देत आहेत.
हायकोर्टानं इम्रान खान यांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यावर बुधवारी सुप्रीम कोर्टानं इम्रान खान यांची अटक बेकायदा असल्याचं सांगत कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते.
अल कादिर ट्रस्ट प्रकरण काय आहे?
सरकारच्या माहितीनुसार, इम्रान खान जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी लँड माफिया मलिक रियाज याला मनी लाँडरिंग प्रकरणात अडकवलं. लंडनमध्ये त्याचे ४० अब्ज रुपये जप्त केले. यानंतर हा पैसा ब्रिटन सरकारनं पाकिस्तानकडे सोपवले. इम्रान खान यांनी याची माहिती आपल्या कॅबिनेटलाही दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर इम्रान खान यांनी अल कादिर ट्रस्ट तयार केला. त्यात धार्मिक शिक्षण देण्यासाठी अल कादिर विद्यापीठही स्थापन केलं. यासाठी अब्जावधी रुपयांची जमीन मलिक रियाज यानं दिली. तसेच इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना हिऱ्याची अंगठी देखील भेट दिली. या बदल्यात रियाजविरोधातील सर्व खटले रद्द करण्यात आले. त्यात त्याला करोडो रुपयांचे सरकारी कंत्राटही मिळाली.
गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी म्हटलं की, ६० अब्ज रुपयांचा फटका सरकारी तिजोरीला बसला. १३ महिन्यांनंतर एकदाही इम्रान किंवा त्यांच्या पत्नी बुशरा या चौकशसाठी आल्या नाहीत. चार वर्षांनंतरही या विद्यापीठात केवळ ३२ विद्यार्थीच शिक्षण घेत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.