Biomedical west  google
ग्लोबल

Covid : वैद्यकीय कचऱ्यामुळे निर्माण झाली गंभीर समस्या

ही समस्या सोडविण्यासाठी कचरा व्यवस्थापन आणि ऑपरेशन्समध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

निनाद कुलकर्णी

कोरोना महामारीचा (Covid Pandemic) सामना करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे (Bio Medical West) मानव आणि पर्यावरण या दोघांनाही धोका निर्माण होत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जागतिक साथ कोरोनाच्या काळात जमा झालेल्या हजारो टन अतिरिक्त कचऱ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, कचरा व्यवस्थापन प्रणाली किंवा कचरा विल्हेवाट प्रणालीवर दबाव वाढला आहे. (WHO On Bio Medical West During Pandemic )

दरम्यान, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विद्यमान कचरा व्यवस्थापन (West Management) प्रणाली आणि ऑपरेशन्समध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. जगभरातील कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे 200,000 टनांहून अधिक वैद्यकीय कचरा तयार झाला असून, यातील बहुतेक कचरा हा प्लास्टिकचा असल्याचे म्हटले आहे.

मार्च 2020 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत, वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी सुमारे 1.5 अब्ज पीपीई किट (PPE Kit) तयार आणि वितरित करण्यात आल्यायाचे सांगत याचे वजन सुमारे 87,000 टन असल्याचे WHO सांगितले आहे. हे प्रमाण केवळ UN प्रणाली अंतर्गत वितरीत केलेल्या उपकरणांसाठी आहे, तर वास्तविक प्रमाण आणि संख्या खूप जास्त असल्याचेदेखील डब्ल्यूएचओने म्हटले आहे. यातील बरीचशी उपकरणे आणि संरक्षक किट कचऱ्याचा भाग बनले आहेत. याव्यतिरिक्त, जगभरात 140 दशलक्ष चाचणी किट (Covid Testing Kit) प्रदान करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 2,600 टन प्लास्टिक आणि 7,31,000 लीटर रासायनिक कचरा (Chemical West During Covid 19) जमा होण्याचा धोका असून, वैयक्तिक वापरासाठी फेस मास्कचा (Face Mask) समावेश यामध्ये करण्यात आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT