china corona china corona
ग्लोबल

चीनमध्ये विचित्र मार्गदर्शक तत्त्वे जारी; म्हणते एकत्र झोपू नका अन्...

सकाळ डिजिटल टीम

चीनमधील (china) कोरोनाच्या नव्या लाटेमुळे (coronavirus) सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोना लॉकडाऊनअंतर्गत सरकारने अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या शांघाय (Shanghai) शहरात नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोग्य कर्मचारी रस्त्यावरील माईकवर लोकांना चेतावणी देत ​​आहेत की, जोडप्याने रात्री एकत्र झोपू नये, शक्य असल्यास चुंबन टाळावे आणि वेग वेगळे जेवण करावे. सरकारच्या या विचित्र आणि निकृष्ट निर्बंधांमुळे रहिवाशांचे जगणे कठीण होऊ लागले आहे.

शांघाय शहर हे चीनमधील (china) सध्याच्या कोरोना महामारीचे हॉटस्पॉट आहे. काही दिवसांपासून शहरातील दैनंदिन संसर्गाच्या संख्येत घट झाली असली तरी देशातील इतर शहरांच्या तुलनेत ते अजूनही जास्त आहे. शहरातील अडीच कोटी लोकसंख्येला प्रशासनाने घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या (coronavirus) रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मॉल्स आणि सुपरमार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या कोरोना चाचण्या होईपर्यंत निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या (coronavirus) नवीन नियमांनुसार चीन शांघायमध्ये (Shanghai) राहणाऱ्या लाखो लोकांवर अत्याचार करीत आहे. लोकांना खोलीची खिडकी उघडू नका, गाणी म्हणू नका आणि घरातच थांबा अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. शांघायमधील लोक अन्नासाठी तरसत आहे. दुकाने बंद असल्याने घरात ठेवलेला अन्नधान्य संपुष्टात येऊ लागला आहे.

तांदूळ आणि मांसासारख्या मुख्य पदार्थांचा पुरेसा साठा

शांघायमध्ये तांदूळ आणि मांसासारख्या मुख्य पदार्थांचा पुरेसा साठा आहे. परंतु, महामारी नियंत्रण उपायांनी वितरण आणि शेवटच्या घटकापर्यंत वितरणात समस्या निर्माण केल्या आहेत. शहरातील काही घाऊक बाजारपेठा आणि खाद्यपदार्थांची दुकाने पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करेल आणि अधिक वितरण कामगारांना बंद क्षेत्राबाहेर जाण्याची परवानगी देईल, असे शांघाय शहराचे उपमहापौर चेन टोंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘जोडप्यांनो इकडे लक्ष द्या’

एका व्हिडिओनुसार आरोग्य कर्मचारी ध्वनिवर्धकावरून सूचना देत गल्लोगल्ली फिरत आहेत. एका गृहनिर्माण संस्थेत सूचना देण्यात आली. त्यावेळी सांगण्यात आले की, आज रात्रीपासून जोडप्यांनी वेगळे झोपावे. चुंबन घेऊ नये. मिठी मारण्याची परवानगी नाही. जेवणही एकट्याने करा. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT