Pakistan Blast: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका राजकीय पक्षाच्या बैठकीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात 35 जण ठार झाले आहेत. तर 200 जण जखमी झाले आहेत. बैठकीला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवला. पोलीस आणि स्थानिक नागरिक बचावकार्यात गुंतले आहेत, तर जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात नेले जात आहे. पोलीस मदतकार्यात गुंतले आहेत.
200 हून अधिक लोक जखमी झाले असून मोठ्या संख्येने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानी न्यूज वेबसाइट जिओ न्यूजचा एक कॅमेरामनही जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या राजकीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा स्फोट झाला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
स्फोटानंतरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. जखमी आणि मृतांचा आकडाही वाढू शकतो. पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीशी बोलताना, जेयूआयएफचे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला यांनी जखमींसाठी आपत्कालीन वैद्यकीय उपाययोजना सुनिश्चित करण्याचे आवाहन सरकारला केले. (Pakistan latest News)
त्याचवेळी एका वरिष्ठ स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट कसा झाला याबाबत काहीही सांगता येणार नाही. माहिती गोळा केली जात असल्याचे अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. बचावकार्य सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शी सांगतात की, स्फोट इतका जबरदस्त होता की सुमारे 3 किलोमीटरपर्यंत परिसर हादरला होता. दरम्यान या स्फोटाच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.