Alexei Navalny 
ग्लोबल

Alexei Navalny: नवाल्नी यांचे पार्थिव अखेर आईकडे सोपवले; हृदयावर एक ठोसा मारल्याने मृत्यू झाल्याचा दावा

body of Russian opposition politician Alexei Navalny: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचे पार्थिक अखेर त्यांच्या आईकडे सोपवण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

मॉस्को- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचे पार्थिक अखेर त्यांच्या आईकडे सोपवण्यात आले आहे. जवळपास आठवडाभरापासून त्यांच्या आईकडून पार्थिवाची मागणी केली जात होती. अखेर पार्थिव त्यांना देण्यात आल्याची माहिती प्रवक्त्याने दिली आहे. (body of Russian opposition politician Alexei Navalny has been handed over to his mother)

नल्वाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यारम्युश (Kira Yarmysh) एक्सवर म्हणाल्या आहेत की, अलेक्सी नवाल्नी यांचे पार्थिव त्यांच्या आईकडे देण्यात आले आहे. याकाळात आमच्या सोबत उभे राहणाऱ्यांचे मी आभार मानते. अंत्यसंस्काराचा तपशील अद्याप सांगण्यात आलेला नाही. 'अल जजिरा'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ह्रदयावर ठोसा मारल्याने मृत्यू!

अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू ह्रदयावर एक ठोसा मारल्याने झाल्याचा दावा करण्यात आला आहे. केजीबीची ही जुनी पद्धत आहे. अशाच प्रकारे ते आपल्या विरोधकांना संपवतात, असा आरोप मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मानवाधिकार ग्रुप गुलागूचे संस्थापक व्लादिमीर ओसेचिकिन ( Vladimir Osechkin) यांनी टाईम्स ऑफ लंडनला बोलताना हा दावा केला आहे.

नवाल्नी यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र, तीन वर्षातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुतिन यांनीच नवाल्नी यांची हत्या केल्याचा लोकांना संशय आहे. त्त्यामुळे रशियामध्ये असंतोष पसरला आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे रशियन सरकारने दडपशाही अवलंबली आहे. अनेक आंदोलनाकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नवाल्नी यांच्या मृत्यूनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. त्यांच्या मृत्यूसाठी पुतिन यांना जबाबदार धरण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पुतिन यांच्यावर आगपाखड केली आहे. दरम्यान, रशियन सरकारने यात कुणाचा हात नसल्याचा दावा केला आहे. असे असले तरी नवाल्नी यांचा मृत्यू गूढ आहे हे नक्की. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT