अफगाणिस्तानच्या (Afghanistan) बल्ख प्रांतात गुरुवारी (ता. २८) सायंकाळी दोन बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाले. या बॉम्बस्फोटात नऊ ठार तर १३ जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. (Afghanistan Nine killed in two bomb blasts)
टोलो न्यूजनुसार, दोन्ही स्फोट सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य करून करण्यात आले. बाल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ भागात हे बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्यात आले. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रांतीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना तातडीने रुग्णालयांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत. मागच्या गुरुवारीही मजार-ए-शरीफ येथील मशिदीत झालेल्या स्फोटात डझनभर उपासक ठार आणि जखमी झाले होते. सी-दुकान मशिदीमध्ये सुमारे ४०० लोक नमाज पढत असताना स्फोट झाला होता. त्या स्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (ISIS) स्वीकारली होती. शिया मशिदीवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखणाऱ्या इसिसच्या संशयित दहशतवाद्याला तालिबानी सैन्याने अटक केली होती.
शिया समुदायावर हल्ले
अफगाणिस्तानमधील (Afghanistan) शिया समुदायावर अनेकदा प्राणघातक हल्ल्यांची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. शिया अफगाण बहुतेक हजारा वांशिक समुदायातील आहेत. देशातील ३८ दशलक्ष लोकांपैकी १० ते २० टक्के लोक शिया आहेत. शिया समुदाय बऱ्याच काळापासून आयएसआयच्या निशाण्यावर आहे. आयएसआय शिया समुदायाला विधर्मी मानतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.