Boston sakal
ग्लोबल

USA : अमेरिकेतील सर्वात सुरक्षित शहर - बॉस्टन

USA : बॉस्टन शहर अमेरिकेतील सर्वात सुरक्षित शहर बनले असून, गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांची सतर्कता आणि समाजातील परस्पर विश्वास महत्त्वाचा ठरला आहे.

विजय नाईक,दिल्ली

नवी दिल्ली : अमेरिकेतील 277 शहरांपैकी बॉस्टन हे सर्वात सुरक्षित शहर बनले आहे. अमेरिकेतील बंदुक संस्कृतीबाबत मी आधी लिहीले होते. अमेरिकेच्या घटनेनुसार, स्वरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाला बंदूक, पिस्तुल आदी वापरण्याचा अधिकार आहे. अमेरिकेत गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होय.

परंतु, गुन्हेगारीची देशव्यापी माहिती संकलित करणाऱ्या `एएच डेटालिटिक्स’ या संघटनेनुसार, ``277 शहरातील खुनांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा 18 टक्क्यांनी कमी झाले आहे. फिलाडेल्फिया व बाल्टिमोर या गुन्हेगारीच्या संदर्भात सर्वाधिक आघाडीवर असलेल्या शहरातही बॉस्टनप्रमाणे गुन्ह्यात घट झाली असून, फिलाडेल्फियामध्ये गेल्या वर्षीपेक्षा खुनांचे प्रमाण 111 अंकाने कमी झाले.’’

बॉस्टन शहर कसे सुरक्षित झाले? त्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले , यापासून भारतीय शहरांना शिकण्यासारखे बरेच काही आहे. या संदर्भातील लेख प्रसिद्ध नियतकालिक `द इकॉनॉमिस्ट’ च्या 14 ते 20 सप्टेंबर, 2024 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

बॉस्टन मधील रॉक्सबरी या परंपरागत कृष्णवर्णीय उपनगराचे पोलीस प्रमुख हसीब हुसेन म्हणतात, की या उपनगरात गेल्या वर्षी एकही खून झाला नाही. ``खून होऊ नये यासाठी आमच्या प्रार्थना चालू असतात. गुन्हे घडू नयेत यासाठी पोलीस खाते सतत जागरूक असते.’’ बॉस्टन विषयी प्रसिद्ध झालेल्या एका महितीनुसार, ``2018 -19 पासून बॉस्टनमध्ये गुन्हयांचे प्रमाण घटू लागले.

तथापि, आजही अमेरिका बऱ्याच प्रमाणात `हिंसक राष्ट्र’ आहे. खुनांचे प्रमाण इटली पेक्षा अमेरिकेत 14 पटीने अधिक आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कृष्णवर्णीय व लॅटिनोज् मध्ये अधिक आहे. तरूण कृष्णवर्णीयांमध्ये हिंसेचे प्रमाण सर्वाधिक असून, वयाची तीस वर्षे पूर्ण होण्याआधीच ते कोणत्या न कोणत्या कारणांमुळे ते ठार होतात.’’

बॉस्टनमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, याचे कारण घरामागे मध्यक उत्पनांचे असलेले प्रमाण होय. ते 86 हजार डॉलर्स आहे. देशाच्या 75 हजार डॉलर्स या प्रमाणापेक्षा ते अधिक आहे. बॉस्टन अमेरिकेतील विद्येचे माहेरघर होय. असंख्य तंत्रज्ञान व वित्त कंपन्यांच्या मुख्यालयांचे शहर आहे. निरनिराळ्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे बेरोजगारीमुळे तरूणांमध्ये होणाऱ्या निराशेचे प्रमाणही कमी.

दक्षिण बॉस्टन हे अमेरिकेतील सर्वात महागडे उपनगर मानले जाते. बॉस्टनमध्ये अत्यंत चांगली आरोग्यसेवा व ट्रॉमा (आघात केंद्रे) सेन्टर्स आहेत. हिंसक घटना घडली, तरी त्यात जखमी झालेल्यांना उत्तम उपचार उपलब्ध होतो. बॉस्टनच्या अंदाजे 7 लाख लोकसंख्येपैकी एक पंचमांश कृष्णवर्णीय आहेत. 1990 पासून त्यांचे प्रमाण वाढलेले नाही. गरीबीचे प्रमाण शिकागोप्रमाणेच 17 टक्के आहे. पण वॉशिंग्टनमध्ये मात्र खुनांचे प्रमाण 2023 मध्ये सात पटीने वाढले होते.

अमेरिकेत कृष्णवर्णीयांची वेगळी उपनगरे व वसाहती आहेत. उदा. न्यू यॉर्कमध्ये हार्लेम हे कृष्णवर्णीयांचे उपनगर आहे. तेथे अधिक गुन्हे होतात. अलीकडच्या काळात असेही दिसून आले आहे, की अनेक श्वेतवर्णीय माथेफिरूंनी एके-47 सारख्या हत्यारांचा वापर करून मोठे जमाव, मॉल्स, शाळा, रेल्वे स्थानके आदींवर प्राणघातक हल्ले केले. अमेरिकेच्या अनेक महानगरातून शाळांवर झालेल्या हल्ल्यात निष्पाप मुलं ठार झाली. त्यामुळे, पालकांत दहशत पसरली. ती अद्याप कमी झालेली नाही.

``गुन्हयांचे प्रमाण कमी करावयाचे असेल, तर परस्पर विश्वास वाढविण्याची गरज आहे,’’ असे रेव्हरंड युजेन रिव्हर्स यांचे म्हणणे आहे. विश्वास संपादन करण्याची प्रक्रिया गेली दोन दशके सुरू आहे. 1998 मध्ये रेव्हरंड रिव्हर्स यांनी साप्ताहिक सभा (बेकर हाऊस) सुरू केल्या.

अलीकडे 4 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला तीन जिल्हाधिकारी, सफॉक्स कौन्टीचे एटर्नी केव्हिन हेडन, ज्येष्ठ प्रशिक्षणार्थी अधिकारी, गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थातील कर्मचारी, चर्चमधील अनेक अधिकारी, समाजसेवक, प्रा.विनशिप व `द इकॉनॉमिस्ट’ नियतकालिकाचा पत्रकार या सर्वांची बैठक घेतली व कायदा व सुव्यवस्थेविषयी विचारविनिमय केला. जनतेकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली. पोलिसांच्या कामकाज प्रणालीत सुधार केल्यास लक्षणीय बदल घडवून आणता येईल, यावर एकमत झालं.

प्रा.विनशिप यांच्यामते, तीस वर्षांपूर्वी बॉस्टनचे पोलिस खाते गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणताही विचार न करता संपूर्ण वसाहतीला लक्ष्य करून त्यातील गुन्हेगारांवर कारवाई करीत. अमेरिकेतील अनेक शहरातून आजही हीच पद्धत अस्तित्वात आहे. 1995 मध्ये एका कृष्णवर्णीय पोलीस अधिकाऱ्याला त्याच्याच सहकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली.

गुन्हेगाराचा पाठलाग करताना संबंधित अधिकारी हाच गुन्हेगार आहे, असे मानून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पण, आपली चूक झाली, असे त्या पाठलाग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास जेव्हा समजलं, तेव्हा जखमी अधिकाऱ्याला तसंच रस्त्यात सोडून तो पळून गेला. आज तोच (जखमी) अधिकारी मायकेल कॉक्स बॉस्टनचा पोलीस कमिशनर झाला आहे. कॉक्स म्हणतात, की पोलिस खात्यावरचा विश्वास आता अधिक दृढ झालाय.

आम्ही तीस वर्षापूर्वी होतो, तसे राहिलेलो नाही. संशयित दिसताच क्षणी आम्ही त्वरित शरिराची तपासणी करीत नाही आणि तो स्वतःकडे असलेलं पिस्तुल आमच्यावर रोखेल, असा प्रसंग येत नाही. ``तरूणांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. परंतु ते कोण आहेत, ते का गुन्हे करतात, हे समजाऊन घेणे गरजेचे असते.’’

बॉस्टनमध्ये `रॉका’ नावाची स्वयंसेवी संस्था हिंसाचाराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी कार्यरत असून तीत 300 तरूण काम करतात. युवकांनी हिंसाचाराकडे वळू नये, यासाठी त्यांच्याबरोबर संपर्क साधणे, त्यांची वागणूक सुधारावी यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे, वेळ प्रसंगी त्यांना रोजगार देण्याचे काम संस्था करते. सस्थेचे संचालक कार्ल मिरांडा म्हणतात, की हिंसक तरूणांच्या टोळ्यांवर आम्ही नजर ठेवतो व त्यांना सतत मानसिक दबावाखाली ठेवतो. त्याचाही लाभ समाजाला होत आहे. 2020 मध्ये मिनियापोलीसमध्ये कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड चा खून झाल्यापासून तरूणांच्या हिंसक टोळ्यांवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेच्या सर्व राज्यातून थोड्याफार प्रमाणात असे प्रयत्न होत आहेत. तथापि, जनतेचा पोलिसांवर आजही हवा तसा विश्वास नाही, ही सर्वात मोठी उणीव आहे.

बॉस्टनमध्ये कायदा व सुरक्षितेबाबत झालेला लक्षणीय बदलाची पाहाणी करण्यासाठी अमेरिकेच्या अन्य राज्यातील पोलीस खात्यांची शिष्टमंडळे बॉस्टनला भेट देत आहेत व बॉस्टन मिरॅकल (बॉस्टन चमत्कार) चे गुपित काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.भारतीय पोलीस खात्याला बॉस्टनच्या अनुभवापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT