नवी दिल्ली- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन एप्रिलच्या शेवटी भारत दौऱ्यावर येणार आहेत. बोरिस जॉन्सन यांच्या या दौऱ्याचा एक महत्त्वाचा हेतू चीनवर नजर ठेवण्याचाही आहे. भारताने बोरिस जॉन्सन यांना आपल्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिलं होतं. पण, त्यांच्या देशात सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे त्यांनी भारत दौरा रद्द केला होता. आता भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ते भारतात येईपर्यंत त्यांच्या दौऱ्याची अनिश्चितता कायम असणार आहे. विशेष म्हणजे बोरिस जॉन्सन यांची यूरोपीयन यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर हा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. बोरिस जॉन्सन यांच्या कार्यालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. यूरोपीय यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन हिंद-प्रशात क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. भारत या भागातील प्रमुख देश असल्यानेच बॉरिस जॉन्सन यांनी पहिल्यांदा भारताला भेट देण्याचं ठरवलं असल्याचं सांगण्याच येतंय.
चीनवर असणार लक्ष
ब्रिटनचा प्रमुख हेतू हिंद-प्रशांत क्षेत्रातील लोकशाही देशाच्या मदतीने चीनवर मात करण्याचा आहे. गेल्या काही दिवसांपासून हाँग काँग, कोरोना महामारी आणि ब्रिटेनच्या 5 जी नेटवर्कमध्ये चीनच्या Huawei कंपनीला डालवण्यात आले अशा मुद्द्यांवरुन बीजिंग आणि ब्रिटेनमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती ब्रिटन भारताकडे एक तगडा सहयोगी म्हणून पाहात आहे.
पंतप्रधान मोदींना दिले जी-7 चे निमंत्रण
ब्रिटनने मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या कोर्नवाल क्षेत्रात जून महिन्यात होणाऱ्या जी-7 मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. जी-7 मध्ये ब्रिटेन, कॅनाडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जापान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. ब्रिटेनने या संमेलनासाठी भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांना अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या भारतभेटीकडे एक संधी म्हणून पाहिलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.