omicron Esakal
ग्लोबल

ओमिक्राॅनकडे दुर्लक्ष नको! ब्रिटनमध्ये एका दिवसात १० हजार नवे रुग्ण

कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनला गांभीर्याने न घेणे हे आपल्याला महागात पडू शकते.

सकाळ डिजिटल टीम

लंडन : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनला गांभीर्याने न घेणे हे आपल्याला महागात पडू शकते. भारतात या व्हेरिएंटचे १४३ पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. मात्र तिच्या वाढीच्या वेगावर लक्ष देणे आवश्यक आहे. ओमिक्राॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारत आहे. दुसरीकडे आपल्या समोर ब्रिटनचे (Britain) उदाहरण जेथे जगात सर्वप्रथम कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आणि जवळपास सर्वच प्रतिबंध मागे घेण्यात आली होती. आज ओमिक्राॅनमुळे (Omicron) ब्रिटन पुन्हा संकटात सापडला आहे. येथील स्थिती पाहून कोरोनाच्या पहिल्या लाटेत इटलीतील भयवाह स्थितीची आठवण होते. पहिल्या लाटेच्या दरम्यान इटलीत सर्वाधिक संक्रमणाचे प्रमाण आणि वाढत्या कोरोनामुळे मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र ब्रिटनमध्ये आता दवाखान्यात भरती होणारे आणि मृतांचा आकडा कमी आहे. मात्र संक्रमणाचा आकडा वेगाने दररोज एक लाख रुग्णांकडे मार्गक्रमण करताना दिसेल. शनिवारी येथे कोरोना विषाणुचे ९० हजार ४१८ बाधितांची नोंद झाली. आतापर्यंत ब्रिटनमध्ये ओमिक्राॅनचे जवळपास २५ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की गेल्या २४ तासांमध्ये ओमिक्राॅनचे १० हजारांपेक्षा अधिक केसेस समोर आले आहेत. (Britain Reports High Rise In Omicron Cases)

ओमिक्राॅनला ओमिकोल्ड म्हणणे ठरेल चुकीचे

फोर्ब्सच्या एका लेखात आरोग्य तज्ज्ञ ब्रूस वाईली म्हणाले, आपल्या ओमिक्राॅनला ओमिकोल्ड म्हणणे योग्य नाही. कारण हे फक्त साधारण कोल्डसारखे मुळीच नाही. ओमिक्राॅन लोकांना आजारी पाडू शकते. त्यांना दवाखान्यात नेऊ शकते. दुसरीकडे ते लोकांचा जीवही घेऊ शकतो. १६ डिसेंबरपर्यंत ब्रिटनमध्ये ओमिक्राॅनमुळे ८५ लोकांना दवाखान्यात भरती करावे लागले आहे. तज्ज्ञांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सनला ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त लाॅकडाऊनसारखे प्रतिबंध लागू करण्याचा सल्ला दिला आहे. जाॅन्सन त्याकडे डोळझाक करित आहेत.

लाॅकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत जाॅन्सन नाहीत

ब्रिटनचे मुख्य आरोग्य अधिकारी प्रा. ख्रिस व्हिट्टी आणि मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक वालॅन्सने शनिवारी कॅबिनेट सदस्यांना इशारा दिला की देशात प्रत्येक दिवशी ३ हजारांपेक्षा अधिक दवाखान्यात भरती होण्यापासून रोखण्यासाठी कडक उपाय योजाना करण्याची आवश्यकता आहे. लाॅकडाऊनसारखा निर्णय घेणे सरकारांसाठी एक आव्हानात्मक पाऊल आहे. मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल सिद्ध होऊ शकतो. आणि तसे सिद्ध झाले आहे. मात्र बोरिस जाॅन्सन आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने ख्रिसमसपूर्वी तात्काळ प्रतिबंध लागू करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

डेलीमेलच्या वृत्तानुसार कोणतेही नवीन उपाय ब्रिटनच्या नवीन वर्षावर परिणाम करु शकतो. जाॅन्सन वैयक्तिक स्वरुपात ख्रिसमस पूर्व कोणतेही प्रतिबंध लागू करण्यास विरोध करित आहेत. दुसरीकडे बूस्टर डोसमुळे परिस्थितीवर नियंत्रण आणले जाऊ शकते. बहुतेक कॅबिनेट सदस्यांनी त्यांचे समर्थन केले आहे. मात्र प्रश्न निर्माण होतो की मोठ्या संख्येने जर लोक संक्रमित झाले किंवा दवाखान्यात भरती झाले तर याने कोरोना लसीकरण मोहिमेवर ही परिणाम होऊ शकतो. दरम्यान लसीकरणची परिणामकारकता यावरुन ही गैरसमजूतीची स्थिती बनली आहे. त्यातून एक भयावह स्थिती निर्माण होऊ शकतो.

दररोज पाच हजारांपेक्षा जास्त मृतांचा आकडा जाऊ शकतो

काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे प्रा. नील फर्ग्यूसनने सुचवले होते, की जर योग्य प्रतिबंध लावले गेले नाही तर थंडीत ब्रिटनमध्ये ओमिक्राॅनने होणारा मृतांचा आकडा पाच हजारांपर्यंत जाऊ शकतो. वाढत्या आकड्यांवर प्रा. फर्ग्यूसन यांनी नवीन वर्षात प्रतिबंध कडक करण्याची विनंती केली आहे. इंपिरियल काॅलेज लंडनमध्ये त्यांच्या टीमला आढळले की सर्वोत्तम स्थितीत सुद्धा प्रतिबंधांविना जानेवारीत जवळपास तीन हजार दैनंदिन ओमिक्राॅन मृतांचा आकडा असू शकतो. नवीन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत कमी हानीकारक असल्याचे कुठे ही सिद्ध झालेले नसल्याचे इंपीरियलने म्हटले आहे. संशोधकांनुसार त्याने लोक दुसऱ्यांदा संक्रमित होण्याची आणि कोरोना लसीकरण कमी होण्याची शक्यता साडेपाच टक्क्यांनी अधिक आहे.

ओमिक्राॅनची प्रमुख लक्षणे कोणती ?

एका अभ्यासानुसार शिंकणे, डोकेदुखी आणि थकवा ओमिक्राॅनचे प्रमुख लक्षणे असल्याचे कळते. लंडनमधील रुग्णांच्या विश्लेषणाच्या आधारावर ३ ते १० डिसेंबरच्या दरम्यान व्हायरसचे सर्वात सामन्य लक्षणे जसे वाहते नाक, डोकेदुखी, थकवा, शिंकणे आणि गळ्यात खवखव अशी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT