Hardeep Singh Nijjar esakal
ग्लोबल

Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेत मौन; भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

India Canada Tension : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्यासाठी कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आलं होतं. भारताने कॅनडाच्या या कारनाम्याला प्रत्युत्तर दिलं आहे आणि या प्रकाराचा निषेध केला.

हरदीप निज्जर हा एक खलिस्तानी दहशतवादी होता, त्याला मागच्या वर्षी कॅनडामध्ये खून झाला होता. कॅनडाच्या ट्रूडो सरकारने निज्जरच्या हत्येवरुन भारतावर निशाणा साधला होता आणि गंभीर आरोप केले होते.

हरदीप निज्जरसाठी कॅनडामध्ये मौन पाळल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पलटवार करत, ''आम्ही अशा प्रकारच्या राजकीय घडामोडींचा विरोध करतो.. आम्ही दिल्लीतल्या कॅनडीयन दूतावासासमोर विरोध दर्शवला आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई भारताला अपेक्षित आहे.'' असं भारताने म्हटलं आहं.

यापूर्वीदेखील भारताने कॅनडाला या प्रकरणात उत्तर दिलं होतं. मागच्या काही दिवसांपूर्वी हरदीप सिंह निज्जरच्या आठवणीत कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आलेलं होतं. न्यूज एजन्सी आयएएनएसद्वारे जारी केलेल्या व्हिडीओमध्ये खासदारांनी मौन पाळल्याचं दिसून येत होतं. याचवेळी स्पीकर ग्रेग फर्गन यांनी म्हटलं की, मला वाटतंय हरदीप सिंह निज्जर यांच्या आठवणींमध्ये मौन ठेवण्यासाठी सर्वांची सहमती आहे, ज्यांचा एका वर्षापूर्वी खून झाला होता.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची मागच्या वर्षी कॅनडा येथे ब्रिटिश कोलंबिया प्रांतात एका गुरुद्वाराच्या बाहेर हत्या झाली होती. निज्जर हा खलिस्तानी टायगर फोर्सचा मास्टरमाईंड होता. त्यामुळे तो भारताला हवा होता. २००७ मध्ये पंजाबमधल्या एका सिनेमागृहात झालेल्या बॉाम्बस्फोट प्रकरणाचा तो आरोपी होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast : सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ ते मेल-एक्स्प्रेसना जोडले जामार दोन जणरल डबे

Pune News : गुंठेवारीच्या घरांना दिवाळी भेट! नियमितीकरण शुल्कात ५० टक्के सवलत

अभिजात दर्जा मिळाला; पुढे काय?

आजचे राशिभविष्य - 17 ऑक्टोबर 2024

Mumbai Local: सुशोभीकरण नंतरही हेच चित्र; डोंबिवली स्टेशनची परिस्थिती जैसे थे, खर्च पाण्यात

SCROLL FOR NEXT