Canada Esakal
ग्लोबल

Canada: पंतप्रधान ट्रुडो कॅनडाच्या संसदेत आक्रमक! खलिस्तानी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतबाबत मोठं वक्तव्य केले आहे. भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येचा तपास करण्यात देशातील सुरक्षा यंत्रणा व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(Latest Marathi News)

ओटावा येथील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना ट्रूडो म्हणाले की, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधाच्या आरोपांची चौकशी करत आहेत.

कॅनडाच्या नागरिकाच्या स्वत:च्या भूमीवर झालेल्या हत्येमध्ये इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही, असंही ट्रूडो यावेळी बोलताना म्हणाले आहेत. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, जे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे मूलभूत नियमांच्या विरुद्ध आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक संतप्त आहेत आणि कदाचित घाबरलेही आहेत. त्यामुळे आम्हाला बदलण्यास भाग पाडू नका. भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची 18 जून रोजी कॅनडातील सरे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडातील गुरुद्वाराबाहेर निज्जरवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.(Latest Marathi News)

संसदेत ट्रूडो काय म्हणाले?

'आज मला एका अत्यंत गंभीर विषयाची सभागृहाला जाणीव करून द्यायची आहे. मी थेट विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळवले आहे, पण आता मला सर्व कॅनेडियन लोकांना सांगायचे आहे.'

'गेल्या काही आठवड्यांपासून, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबधांची चौकशी करत आहेत. कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा देश आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण महत्त्वाचे आहे.'

'आमच्या सुरक्षा एजन्सी आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी सर्व कॅनेडियन लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या हत्येतील दोषींवर कारवाई करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

कॅनडाने हा मुद्दा भारत सरकारचे उच्च अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. गेल्या आठवड्यात, मी वैयक्तिकरित्या हा मुद्दा थेट पंतप्रधान मोदींसोबत G20 मध्ये मांडला होता. आपल्याच भूमीवर कोणत्याही कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत परदेशी सरकारचा सहभाग म्हणजे आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे.'(Latest Marathi News)

'या अत्यंत गंभीर प्रकरणावर आम्ही आमच्या भागीदारांसोबत जवळून काम करत आहोत. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी मी भारत सरकारला कॅनडाला सहकार्य करण्याची विनंती करतो.'

'मला माहित आहे की, बरेच कॅनेडियन, विशेषत: भारतीय वंशाचे कॅनेडियन समुदाय सध्या रागावलेले आहेत आणि कदाचित घाबरले आहेत. आम्हाला बदलण्यास भाग पाडू नका. आपण आपल्या लोकशाही तत्त्वांवर आणि कायद्याचे पालन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेमध्ये शांत आणि ठाम राहू या. ही आमची ओळख आहे आणि आम्ही कॅनेडियन म्हणून हेच ​​करतो.'(Latest Marathi News)

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत संसदेत पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर कॅनडाने एका उच्च भारतीय अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. निज्जर यांच्या हत्येच्या तपासात भारत सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला आहे.

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी म्हटलं काय, 'जर हे सर्व सत्य सिद्ध झाले तर ते आमच्या सार्वभौमत्वाचे आणि एकमेकांशी वागण्याच्या मूलभूत नियमांचे मोठे उल्लंघन होईल. त्यामुळेच आम्ही एका सर्वोच्च भारतीय मुत्सद्याची हकालपट्टी केली आहे. पीएम ट्रुडो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला आहे.(Latest Marathi News)

जी-20 दरम्यान मोदींसोबत ट्रुडो यांची चर्चा

G20 दरम्यान पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी ट्रुडो यांच्यासमोर खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी त्यांना कॅनडातील अतिरेकी घटकांकडून सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांबाबत भारताच्या चिंतेची माहिती दिली होती.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, अतिरेकी फुटीरतावादाला प्रोत्साहन देत आहेत, भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध हिंसाचार भडकवत आहेत, राजनैतिक संकुलांना लक्ष्य करत आहेत आणि कॅनडातील भारतीय समुदाय आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करत आहेत. हे सर्व कॅनडासाठीही चिंतेचा विषय आहे.

कोण आहे हरदीप सिंग निज्जर?

निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. तो गेली अनेक वर्षे कॅनडात राहत होता आणि तेथून भारताविरुद्ध खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालत होता. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर गेल्या वर्षभरात भारतीय तपास यंत्रणांसाठी आणखी मोठी डोकेदुखी बनला होता कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात मदत आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती.(Latest Marathi News)

2018 मध्ये जेव्हा ट्रुडो भारत भेटीवर आले होते. त्यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी दिली होती, ज्यामध्ये निज्जर यांच्या नावाचाही समावेश होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

2010 मध्ये पटियाला येथील मंदिराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. हिंसाचार भडकावणे, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे यासह अनेक प्रकरणांत पोलीस त्याचा शोध घेत होते.(Latest Marathi News)

भारत सरकारने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. एनआयएने त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT