बीजिंग : सौंदर्यवर्धनासाठी केलेली शस्त्रक्रिया (कॉस्मेटिक सर्जरी) चुकल्यामुळे चीनच्या एका अभिनेत्रीचे नाक विद्रूप झाले. त्यामुळे तिला भूमिका गमवाव्या लागल्या असून, याचा मोठा आर्थिक फटकाही बसणार आहे. तिचे नाव गाओ लियू असे असून ती गायिकाही आहे. ट्विटरसारख्या वेईबो या सोशल मीडियावर तिने नाक दाखविणारा स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे. तिला तब्बल ५० लाख फॉलोअर्स आहेत. आपला धक्कादायक अनुभव तिने कथन केला असून, त्यापासून बोध घेऊन सावध राहण्याचे आवाहनही चाहत्यांना केले आहे.
गाओला एका मित्राने नाक ट्रीम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गत वर्षाच्या अखेरीस ती ग्वांगझू येथील एका कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिकमध्ये दाखल झाली. चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर तिचे नाव सुंदर दिसण्याऐवजी तेथील पेशी मृत झाल्या. त्यावर सूज आली. त्यानंतर संबंधित क्लिनीककडे योग्य परवानाच नसल्याचे तिला समजले. त्यानंतर फॉलो-अपच्या वेळी नाकाची अवस्था आणखी खराब झाली. गाओने दोन नाटकांमधील भूमिकांसाठी करार केला होता. पण, सर्जरी चुकल्यामुळे तिला यास मुकावे लागले. परिणामी तिला चार लाख युआनचा फटका बसले. याशिवाय करार मोडल्याबद्दल २० लाख युआनची भरपाईही तिला द्यावी लागू शकेल.
क्लिनिकची चौकशी सुरू
दरम्यान, स्थानिक वृत्तपत्रानुसार ग्वांगझू प्रांतातील आरोग्य खात्याने याप्रकरणी क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांची न्यायालयीन चौकशी सुरु केली आहे. गाओ हिच्याबद्दल अनेक चाहत्यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. तिच्या पोस्टनंतर अब्जावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या उद्योगाला कडक नियम आणि अटी लागू करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरीत आहे.
अशीही चिनी बाजारपेठ
इथेही बोगस आहेच
आकडेवारीनुसार २०१९ मध्ये चीनमधील अवैध प्लॅस्टिक सर्जरी क्लिनिकची संख्या ६० हजारच्या वर गेली. हा आकडा मान्यताप्राप्त क्लिनिकच्या सहा पट आहे. दरवर्षी तेथे सुमारे ४० हजार वैद्यकीय दुर्घटना घडतात. दिवसाची संख्या सरासरी ११० इतकी आहे. अनेक चिनी नागरिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी दक्षिण कोरियाला जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.