corona update 10 days of lockdown is imposed in 61 villages of ahmednagar district Esakal
ग्लोबल

लक्षणे नसताना चीनचे नागरिक होतायत कोरोनाबाधित, शांघायमध्ये लाॅकडाऊन

कोरोनामुळे स्थिती बिघडल्याने लोकांनी घाबरुन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. यामुळे सुपरमार्केटमधील सामान आणि अत्यावश्यक वस्तू संपल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शांघाय : चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणा बाहेर गेल्याचे दिसत आहे. रविवारी (ता.२७) शांघायमध्ये ३ हजार ५०० पेक्षा जास्त लोक कोरोनाबाधित झाले आहेत. मात्र चिंतेची बाब ही की यातील अनेक रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाहीत. सरकारने कोरोना चाचण्या करण्यासाठी लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. आकड्यानुसार चीनमध्ये या महिन्यात कोरोना संक्रमणाने ५६ हजारांपेक्षा जास्त नवीन प्रकरणे समोर आली आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, रविवारी चीनच्या (China) एकूण नवीन बाधितांपैकी एकट्या शांघाईत ७० टक्के रुग्ण आढळले आहेत. यातील ५० टक्के रुग्णांना कोरोनाचे (Corona) लक्षणे दिसत नाहीत. (China Corona News Covid Cases Hikes, Lock Down Impose In Shanghai)

शांघायमध्ये सोमवारी (ता.२८) टप्प्याने लाॅकडाऊन (Lock Down) करण्यास सुरुवात झाली आहे. हे निर्बंध १ एप्रिलपर्यंत लागू राहतील. स्थानिक तज्ज्ञ वू फान म्हणाले, शांघाय (Shanghai) शहरात लावलेल्या लाॅकडाऊनचा उद्देश संभावित धोका टाळणे आणि रुग्णसंख्या शून्यावर आणणे हा आहे. स्थानिक सरकारने म्हटले आहे, की शांघायचे पुदोंग आणि जवळपासच्या भागांमध्ये आज सोमवार ते शुक्रवारपर्यंत (१ एप्रिल) लाॅकडाऊन राहील. मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्यांची सुरुवात झाली आहे.

लाॅकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात हुआंग्पू नदीच्या पश्चिम भागातील डाऊनटाऊन क्षेत्रात शुक्रवारपासून ५ दिवसांच्या लाॅकडाऊनला सुरुवात होणार आहे. लाॅकडाऊन असलेल्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद राहील. या व्यतिरिक्त कंपनी आणि कारखानेही बंद राहतील. मात्र खाद्य-अन्नपुरवठा आणि सार्वजनिक सेवा चालू राहतील. मात्र इतर कार्यालये आणि व्यवसाय ही बंद राहतील. कोरोनामुळे बिघडत्या स्थितीमुळे लोकांनी घाबरुन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. यामुळे सुपरमार्केटमधील सामान आणि अत्यावश्यक वस्तू संपल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT