ग्लोबल

अरुणाचलमध्ये भारतीय हद्दीत चीनने वसवलं गाव; अमेरिकेचा अहवाल

सकाळ डिजिटल टीम

अरुणाचल प्रदेशात चीनने १०० घरं उभारून गाव वसवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

भारत आणि चीन यांच्यात सीमेवर गेल्या वर्षभरापासून तणावाचं वातावरण आहे. यातच चीनकडून सातत्यानं भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. आता भारत आणि चीन सीमेबाबत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तयार केलेल्या वार्षिक अहवालात धक्कादायक असा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशात चीनने १०० घरं उभारून गाव वसवलं असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन काँग्रेससमोर हा अहवाल सादर करण्यात आला आहे. अरुणाचलमध्ये सीमेला लागून भारताच्या हद्दीत चीनने गाव वसवलं असल्याचं वृत्त जानेवारीमध्ये आलं होतं. त्यावेळी हाय रिझोल्यूशन सॅटेलाइट इमेजेसच्या आधारे हा दावा करण्यात आला होता. चीनने अरुणाचलमध्ये मॅकमोहन लाइनच्या दक्षिणेला भारतीय हद्दीत हे गाव वसवलं आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव सुरु आहे. त्यासंदर्भात अहवालात असं म्हटलं आहे की, २०२० मध्ये चीनने भारत-चीन वादग्रस्त भागात १०० घरे उभारली आहेत. ही घरे तिबेटचे स्वायत्त क्षेत्र आणि भारताचे अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आहे. चीनकडून अशा पद्धतीने बांधकामामुळे निश्चितच भारताच्या चिंतेत भर टाकली आहे.

अरुणाचलमध्ये वरच्या भागात असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यात आणि त्सारी चू नदीच्या काठी चीनने ही घरे बांधली आहेत. हा भाग असा आहे जिथे १९६२ च्या युद्धाच्या आधीही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अनेकदा झटापट झाली आहे. चीनने गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून या भागात एक लहान लष्करी चौकी उभारली होती. २०२० मध्ये मात्र चीनने अचानक या भागात एक पूर्ण गावच वसवलं. याशिवाय चीनने रस्तेही तयार केले आहेत.

सीमेवर तणाव कमी व्हावा यासाठी भारत आणी चीन यांच्यात लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहेत. आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही यात कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, दोन्ही देशांनी सीमेवर शांतता अबाधित राखण्यास आवश्यक ती पावले उचलू असं म्हटलं असलं तरी सीमेवर तणावाचे प्रसंग निर्माण होत असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.

लडाखमध्ये चीन आणि भारत यांच्यात जेव्हा संघर्ष सुरु झाला तेव्हाच अरुणाचलमध्ये त्यांनी बांधकाम केल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षी लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचेसुद्धा अनेक सैनिक ठार झाले होते. अंदाजे ४० सैनिकांनी प्राण गमावल्याचं म्हटलं जात आहे. मात्र चीनने अद्याप याबाबत अधिकृत आकडेवारी किंवा माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT