china pakistan news china gives 1-billion dollar to pakistan bailout policy sakal
ग्लोबल

China-Pakistan : आर्थिक टंचाईने अडचणीत असलेल्या पाकिस्तानला एक अब्ज डॉलरची चीनची मदत

पाकच्या अर्थव्यवस्थेला चिनी ‘ड्रॅगन’चा टेकू

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद :आर्थिक टंचाईने अडचणीत आलेल्या पाकिस्तानच्या मदतीला चीन धावून आला असून एक अब्ज डॉलरचे साह्य केले आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या (एसबीपी) हवाल्याने ‘एआरवाय न्यूज’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

‘एसबीपी’ने शुक्रवारी रात्री पत्रकारांना दिलेल्या एका संक्षिप्त संदेशात चीनकडून एक अब्ज डॉलर मिळाल्याचे सांगण्यात आले. ‘बेलआऊट’ धोरणाअंतर्गत जागतिक नाणेनिधीकडून कर्ज मंजूर करण्याच्या प्रतीक्षेत पाकिस्तान असताना चीनने दिलेली आर्थिक मदत देशासाठी आशेचा किरण ठरली आहे.

पाकिस्तानची परकी गंगाजळी घटत असल्याबद्दल अर्थ मंत्री इशाक दर म्हणाले,‘‘एसबीपीला चीनकडून आज किंवा सोमवारी (ता.१८) १.३० अब्ज डॉलर मिळतील. चीनच्या कर्जफेडीसाठी दिलेली ही रक्कम चीन पुन्हा पाकिस्तानच्या मदतीसाठी देत आहे. दोन अब्ज डॉलरच्या देवाण-घेवाणीबाबत चीनशी चर्चा सुरू आहे.’’

आर्थिक संकटांमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. दिवाळखोरीचा धोका टाळण्यासाठी आवश्यक निधी देण्याबाबत ‘आयएमए’ शी झालेल्या कराराला विलंब लागत आहे. राजकीय अस्थिरतेच्या काळात पाकिस्तानला बाहेरून वित्तपुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

पाकिस्तानने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर ‘आयएमएफ’ने नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानकडे एका महिन्याची आयात करण्यासाठी जेमतेम चलनसाठा आहे. ‘आयएमएफ’कडून ६.६ अब्ज डॉलरपैकी नोव्हेंबरपर्यंत १.१ अब्ज डॉलर मिळण्याची अपेक्षा देशाला होती, परंतु ‘आयएमएफ’ने पुढील हप्ते देण्यापूर्वी अनेक शर्ती लागू केल्या आहेत, असे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT