विश्वाच्या सर्वात दूरच्या भागात फटाक्यांप्रमाणे चमकणारे गामा-किरण टिपण्यासाठी चीनने खगोलशास्त्रीय उपग्रह प्रक्षेपित केले. काल शनिवारी अवकाशात पाठवण्यात आलेला हा उपग्रह चीन आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञांच्या सुमारे 20 वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. मात्र, संयुक्तपणे प्रक्षेपित केलेल्या या उपग्रहाचा काही भाग पृथ्वीवरील निवासी वसाहतींवर पडला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोक इकडे तिकडे धावू लागले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. दुसरीकडे, चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांची मोहीम यशस्वी झाली असून हे यान त्याच्या कक्षेत स्थापित झाले आहे.
शनिवारी, चीन आणि फ्रान्सने संयुक्तपणे प्रक्षेपित केलेला उपग्रह घेऊन गेलेल्या लाँग मार्च 2-सी रॉकेटचा स्फोट झाला. त्याचा काही भाग पृथ्वीवरील निवासी भागावर पडला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. काही काळ लोकांना असे वाटले की, आकाशातून पृथ्वीवर काहीतरी पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर (SVOM) नावाच्या उपग्रहासह अंतराळ यानाने 22 जून (स्थानिक वेळेनुसार) पहाटे 3.00 वाजता शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच रॉकेटचा एक भाग पृथ्वीवर पडला. रॉकेटचा जो भाग पृथ्वीवर पडतो त्याला बूस्टर म्हणतात.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रॉकेट लोकवस्तीच्या परिसरात पडताना दिसत आहे. वाहनाचा काही भाग पडल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आणि बचावण्यासाठी लोक इकडे-तिकडे धावू लागले. चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, हा उपग्रह, एक स्पेस-आधारित मल्टी-बँड व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर (SVOM) लाँग मार्च-2C रॉकेटद्वारे दक्षिण-पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला.
हा उपग्रह आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली उपग्रह आहे आणि यशस्वीरित्या त्याच्या कक्षेत पोहोचला आहे याची पुष्टी करत चिनी अधिकाऱ्यांनी मोहीम यशस्वी घोषित केली. चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, गॅमा-किरणांच्या स्फोटांसह खगोलीय घटनांचा अभ्यास करणे हे उपग्रहाचे ध्येय आहे. चीन आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे विकसित केलेला हा पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह आहे, जो अंतराळ आणि चंद्राच्या शोधात चीनची वाढती ताकद दाखवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.