Corona  esakal
ग्लोबल

विषाणूंचा वापर जैविक अस्त्रासारखा; चीनचा 5 वर्षांपूर्वीच कट

भविष्यात माणसांमध्ये विकार निर्माण करणाऱ्या विषाणूंच्या जोडीला असे विषाणू कृत्रिमरीत्या धूर्तपणे हाताळायचे, त्याचे अस्त्रात रूपांतर करायचे आणि त्याचा वापर करायचा असे कारस्थान रचण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

भविष्यात माणसांमध्ये विकार निर्माण करणाऱ्या विषाणूंच्या जोडीला असे विषाणू कृत्रिमरीत्या धूर्तपणे हाताळायचे, त्याचे अस्त्रात रूपांतर करायचे आणि त्याचा वापर करायचा असे कारस्थान रचण्यात आले.

सिडनी - सार्स कोरोनाविषाणूची (SARS) जागतिक साथ २०१५ मध्ये पसरण्यापूर्वीच चीनच्या (China) लष्करी संशोधक आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी असे विषाणू म्हणजे नव्या युगातील जैविक अस्त्रे म्हणून वापरण्याचा कट आखल्याचे खळबळजनक वृत्त आहे. विकेन्ड ऑस्ट्रेलियन या दैनिकाने हे वृत्त दिले आहे. चिनी संशोधकांनी लिहिलेल्या प्रबंधाचा हवाला त्यात देण्यात आला आहे. भविष्यात माणसांमध्ये विकार निर्माण करणाऱ्या विषाणूंच्या जोडीला असे विषाणू कृत्रिमरीत्या धूर्तपणे हाताळायचे, त्याचे अस्त्रात रूपांतर करायचे आणि त्याचा वापर करायचा असे कारस्थान रचण्यात आले. (china scientists weaponising sars corona viruses 5 years ago report)

सार्स विषाणूचे अनैसर्गिक उगमस्थान आणि मानवनिर्मित विषाणूंच्या नव्या पेशींचा जैविक अस्त्रे म्हणून वापर असे या प्रबंधाचे शिर्षक आहे. त्यातून तिसरे महायुद्ध जैविक अस्त्रांच्या माध्यमातूनच लढले जाईल हेच सूचित होते. या दैनिकाचे वृत्त ऑस्ट्रेलियातील news.com.au या संकेतस्थळाने दिले आहे. त्यात ऑस्ट्रेलियन व्यूहात्मक धोरण संस्थेचे कार्यकारी संचालक पीटर जेनिंग्ज यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हा प्रबंध म्हणजे चीनच्या कारस्थानाचा आतापर्यंत मिळालेला भक्कम पुरावा ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. चिनी संशोधक कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारांकडे एक लष्करी आयुध म्हणून बघत होते आणि ती कशा पद्धतीने वापरता येतील याचा विचार करीत होते हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे हा प्रबंध विलक्षण महत्त्वाचा आहे. लष्करी वापरासाठीचे रोगकारक विषाणू चुकून बाहेर पडल्याच्या शक्यतेलाही पुष्टी मिळते. सायबर सुरक्षा तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांनी या प्रबंधाची कागदपत्रे बनावट नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

चीनचा त्यासाठीच नकार

कोविड-१९ विषाणूच्या उगमस्थानाची चौकशी बाहेरील संस्थांनी करण्याबाबत चीनचा इतका विरोध का आहे हे सुद्धा या प्रबंधामुळे स्पष्ट होते. हे प्रकरण मांसाहारी पदार्थांच्या बाजारपेठेतून उद्भवले असेल तर चौकशीस सहकार्य करणे चीनच्याच हिताचे ठरले असते, पण प्रत्यक्षात चीनची भूमिका याच्याविरुद्ध आहे. यातूनच कटाला पुष्टी मिळते, असेही ऑस्ट्रेलियन व्यूहात्मक धोरण संस्थेचे कार्यकारी संचालक पीटर जेनिंग्ज यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT