india, china, ladakh, america 
ग्लोबल

अमेरिकेच्या नादानं आमच्याशी पंगा घेऊ नका, चीनची भारताला थेट धमकी

सकाळ डिजिटल टीम

पेइचिंग : लडाख सीमारेषेवरील तणावपूर्ण वातावरणाच्या परिस्थितीत चीनने भारताला अप्रत्यक्षरित्या धमकी दिली आहे. अमेरिका आणि आमच्यातील वादापासून दूर रहा, असा इशारा चीनने भारताला दिलाय. चीन-अमेरिकेतील वादाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे, असा आरोपही चीनने केलाय. दोन राष्ट्रांमध्ये (चीन-अमेरिका) सुरु असलेल्या वादात पडल्यास भारताला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असे चीनने म्हटले आहे.  

चीन सरकारचा प्रोपगंडा आखणाऱ्या ग्लोबल टाइम्स मासिकातील लेखानुसार, अमेरिका-चीन यांच्यातील शीतयुद्धात सहभागी होताना भारताने सावधानता बाळगावी, असे म्हटले आहे. जर अमेरिकेच्या साथीने भारताने चीन विरोधात भूमिका घेतली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने भारताला दिलाय. भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठवण्यात येत आहे. या मुद्याचा देखील या लेखात उल्लेख करण्यात आलाय. मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे, असेही चीनने म्हटलंय.  

लडाखच्या सीमारेषेवर भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची बाजू घेतली होती. यावरुनही चीनने अमेरिकेवर निशाणा साधलाय. भारत-चीन यांच्यातील कोणत्याही मुद्यासंदर्भात अमेरिकेची मदत घेण्याबाबत भारताने विचार करायला हवा. अमेरिकेची साथ घेतल्यास मुद्दा आणखी जटील होईल, असेही चीनने म्हटले आहे. चीन आणि भारत यांच्यातील समस्या सोडवण्यासाठी मध्यस्थीसाठी तिसऱ्या राष्ट्राची गरज नाही. दोन्ही देश आपापसातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहेत, अशा शब्दांत चीनने अमेरिकेवर निशाणा साधला आहे. शीतयुद्धाच्या काळात भारत अमेरिकेच्या बाजूने असेल तर त्याचे दोन्ही राष्ट्रांच्या व्यापारावर गंभीर परिणाम होतील. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. त्यामुळे भारताने भूमिका घेताना विचार करावा, असा उल्लेख लेखामध्ये करण्यात आला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही', पंकजा मुंडे असं का बोलल्या? भाजपचंच राजकारण की..?

Champions Trophy 2025: 'काहीही झालं तरी स्पर्धा दुसरीकडे हलवू देऊ नका' पाकिस्तान सरकारचे बोर्डाला आदेश

Rohit Pawar : महाआघाडीच्या १७० जागा येणार निवडून; ‘स्ट्राईक रेट रेकॉर्ड’ तोडणार : रोहित पवार

Sangli Pattern: 'लढा, नडा, पाडा’ नवी मुंबईत ‘सांगली पॅटर्न’ची चर्चा

Cherry Blossoms: भारतातील 'या' ठिकाणी घेऊ शकता 'चेरी ब्लॉसमचा' आनंद, फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT