Young Kim sakal
ग्लोबल

Young Kim : हिंद महासागरावर वर्चस्वाचा चीनचा प्रयत्न;महत्त्वाच्या सागरी मार्गांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न,अमेरिकी खासदाराचा दावा

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : हिंद महासागरातील महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील मोक्याच्या भागावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न चीन करत असल्याने मुक्त व्यापाराला धोका निर्माण झाला असल्याचा दावा अमेरिकेच्या खासदार यंग किम यांनी आज केला. तसेच, चीनच्या या कृतीमुळे अमेरिका व दक्षिण आशियातील त्यांच्या मित्र देशांची सुरक्षा व आर्थिक हितसंबंध धोक्यात आले आहेत, असेही त्या संसदीय समितीसमोर बोलताना म्हणाल्या.

किम म्हणाल्या,‘‘ जागतिक व्यापारासाठी हिंद महासागर हा अत्यंत महत्त्वाचा असून एकूण जागतिक व्यापारापैकी सुमारे ४० टक्के आणि सागरी मार्गाने होणाऱ्या इंधन व्यापारापैकी ८० टक्के व्यापार हिंद महासागरातून होतो. हिंद-प्रशांत क्षेत्रात हिंद महासागराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दक्षिण आशियाला अमेरिकेच्या धोरणात्मक उद्दिष्टांना आव्हाने देणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षाविषयक हितसंबंधांच्या दृष्टीने दक्षिण आशिया महत्त्वाचा प्रदेश आहे.’’

अलीकडच्या काही वर्षांत चीनने पाकिस्तान, श्रीलंकेत विकसित केलेली बंदरे, आफ्रिका खंडातील जिबूती देशात उभारलेला सैन्यतळ आणि मालदीवमध्ये पायाभूत सुविधांत केलेल्या गुंतवणुकीचा उल्लेखही त्यांनी केला. हिंद महासागरामधील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर अडवणूक करण्याच्या चीनच्या प्रयत्नांमुळे इतर देशांना व्यापारात अडथळा निर्माण होत आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

दक्षिण चीन समुद्रावरुन वाद

हिंद-प्रशांत महासागरात संसाधनांनी समृद्ध असलेल्या दक्षिण चिनी समुद्राकडे जागतिक संघर्षाचा संभाव्य केंद्रबिंदू म्हणून पाहिले जाते. या समुद्राच्या बहुतांश भागावर चीन हक्क सांगत आहे तर फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवानही दक्षिण चिनी समुद्रावर प्रतिदावे करत आहेत. अमेरिका या समुद्रावर हक्क सांगत नसला तरी या समुद्रातून मुक्त संचार करणे आपल्या राष्ट्रीय हितासाठी महत्त्वाचे असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच विविध देशांकडून या समुद्राबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

SCROLL FOR NEXT