Corona Update 
ग्लोबल

चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : एका वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणूचा जन्म झाला आणि तो अवघ्या जगभरात पसरला. आजही जगातील अनेक देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. सारं जग ठप्प करायला तसेच अतोनात नुकसान करायला हा व्हायरस कारणीभूत ठरला आहे. यासाठी अर्थातच चीनला जबाबदार धरण्यात आलं. मात्र, आता चीनने या सगळ्याचं खापर भारतावर फोडायचा प्रयत्न केला आहे. चीनमधील शास्त्रज्ञांनी कोरोना हा व्हायरस जगभरात भारतातूनच पसरला असल्याची मल्लिनाथी केली आहे.

चीनमधल्या अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी हा उरफाटा दावा केला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, भारतामध्ये 2019 च्या उन्हाळ्यामध्येच हा व्हायरस जन्माला आला होता. हा धोकादायक व्हायरस जनावरांमधून दुषित पाण्यात गेला. तिथून तो माणसांमध्ये आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. यानंतर तो व्हायरस चीनमधील वुहानमध्ये आला आणि मग चीनमध्ये पहिला रुग्ण सापडला, असा साळसुद आव या संशोधकाने आणला आहे. या साऱ्या चोराच्या उलट्या बोबांचा अहवाल चीनमधल्या एका वृत्तपत्रात छापून आला आहे. त्यात त्यांनी असंही म्हटलंय की, ज्या व्हायरसचे म्युटेशन झालेलं आहे, त्यांचा शोध घेऊन या व्हायरसचा मूळ स्त्रोत शोधता येऊ शकतो. तो मूळ स्त्रोत भारतातच आहे, असं यांचं म्हणणं आहे. 

चीनच्या संशोधकांनी  हीच थिअरी पुढे करत आपल्या दाव्याचं लंगडं समर्थन केलं आहे. वुहानमध्ये जो व्हायरस सापडला तो खरा मूळ व्हायरस नव्हताच. याउलट तो व्हायरस चीन वगळता बांग्लादेश, सर्बिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, झेक प्रजासत्ताक, रशिया अथवा भारतात जन्माला आला असल्याचे आढळून आलं आहे. तसेच बांग्लादेश-भारतामध्ये कमी म्युटेशनचे व्हायरस सापडले आहेत. हे चीनचे शेजारी देश असल्याने कोरोना व्हायरस भारतातच जन्मल्याची अधिक शक्यता या संशोधकांनी व्यक्त केली आहे. तसेच व्हायरसच्या म्युटेशनला लागलेला वेळ आणि या साऱ्या देशांमधून घेतलेले व्हायरसचे नमुने यावरुन संशोधकांनी असा तर्क लावलाय की हा व्हायरस 2019 च्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पसरला आहे. 

याबाबत आता इतर संशोधकांनी या साऱ्या दाव्याविरोधात भुमिका घ्यायला सुरवात केलीय. ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापीठाचे संशोधख डेव्हीड रॉबर्टसन यांनी डेली मेलला म्हटलंय की, हा दावा करणारे चीनचे संशोधन खूपच सदोष आहे. तसेच हे संशोधन निराधार दाव्यांवर आधारित आहे. या संशोधनाने फक्त घुमजाव होत असून अधिक ज्ञानात कसलीही भर पडत नाहीय. चीनने याआधीसुद्धा याचप्रकारे कसलेही ठोस  पुरावे सादर न करता अमेरिका आणि इटलीवर कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत आरोप लगावले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेला मात्र चीनमध्येच हा व्हायरस जन्मल्याचे पुरावे मिळाले आहेत तसेच त्यासाठी त्यांनी चीनला एक तपासणी पथकही रवाना केलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT