Chinese submarine sunk 55 soldiers killed British intelligence china denies any damage Sakal
ग्लोबल

Chinese Submarine : चिनी पाणबुडी तळाला; ५५ सैनिक ठार

ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेची माहिती; नुकसान झाल्याचा चीनकडून इन्कार

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : अमेरिका आणि ब्रिटिश जहाजांना अडकविण्यासाठी तयार केलेल्या सापळ्यात अडकून चीनच्या आण्विक पाणबुडी पिवळ्या समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत ५५ सैनिकांचा मृत्यू झाला. ब्रिटनमधील ‘द टाइम्स या दैनिकाने ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. मात्र चीनने पाणबुडीचे नुकसान झाल्याचा इन्कार केला आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी चीनच्या नौदलाची ‘०९३- ४१७’ ही पाणबुडी मोहिमेवर असताना पिवळ्या समुद्रात चीनी सैन्यदलानेच उभारलेल्या सापळ्यात ती अडकली. उत्तर शांघायमधील शेंडोंग प्रांतात पाणबुडीवरील ऑक्सिजन यंत्रणा निकामी झाला. ऑक्सिजनअभावी ५५ सैनिकांचा मृत्यू झाला. यात पाणबुडीच्या कॅप्टन कर्नल जू योंग-पेंग यांच्यासह २२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही दुर्घटना सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी झाली.

साखळ्या व नांगराला धडक

अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या पाणबुड्यांना अडकविण्यासाठी चिनी नौदलाने समुद्रात उभारलेल्या लोखंडी साखळ्या आणि नांगराच्या अडथळ्याला चीनी पाणबुडी धडकली. या धडकेने ऑक्सिजन यंत्रणा निकामी झाली. पाणबुडी दुरुस्त करण्यासाठी आणि समुद्राच्या पृष्ठभागावर आणण्यासाठी सहा तास लागले. ऑक्सिजनअभावी पाणबुडीतील सर्व सैनिकांचा मृत्यू झाल्याचे गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल अत्यंत गोपनीय असून तो फुटला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘शांग श्रेणीतील या पाणबुडीच्या दुर्घटनेबद्दलच्या अफवा सोशल मीडियावर एक महिन्यापूर्वी पसरल्या होत्या;परंतु चीनने त्याचा इन्कार केला होता.

‘०९३- ४१७’ची वैशिष्ट्ये

चिनी नौदलात ‘०९३’ बनावटीच्या सहा पाणबुड्या १५ वर्षांपासून कार्यरत

पाणबुडी ३५१ फूट लांब

सहा हजार ९६ टन पाणी मागे सारण्याची क्षमता

५५३ मिलीमीटरचे पाणतीर सज्ज

जुन्या आण्विक पाणबुड्यांपेक्षा नव्या पाणबुड्या पाण्यातून जाताना आवाज अत्यंत कमी होतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT