Christmas 
ग्लोबल

जगभरात कोरोनाच्या छायेतही नाताळ उत्साहात

पीटीआय

वॉशिंग्टन/बीजिंग/लंडन - जगभरात कोरोनाचे सावट असतानाही नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे नियमांचे पालन करत काही ठिकाणी ऑनलाइन साजरा झाला. यंदा कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्या १७ लाख लोकांनाही त्यांच्या प्रियजनांनी आदरांजली वाहिली.

पॅलेस्टाइमध्ये नाताळच्या पारंपरिक कार्यक्रमांना अल्प उपस्थिती होती. लेबॅनॉनमध्ये नाताळनिमित्त कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले होते. हजारोजणांनी कोरोनाच्या लाटेच्या भीतीच्या शक्यतेमुळे सावधपणे ताळ साजरा केला. मध्य-पूर्वेत लेबॅनॉनमध्ये सर्वाधिक ख्रिश्चनधर्मीय आहेत. इटलीत चर्चच्या घंटा नेहमीप्रमाणेच वाजल्या. व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांच्यासह १०० पेक्षा कमीजणांची उपस्थिती होती. फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्स स्क्वेअरमधून संबोधित करण्याची परंपरा मोडली. त्याऐवजी त्यांनी अपोस्टोलिक पॅलेसमधून संबोधित केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दक्षिण कोरियातही चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती होती.जर्मनीत प्रसिद्ध ख्रिसमस मार्केट बंद होते. बेल्जियम, कुवैतसारख्या ख्रिश्चनबहुल देशांतही अनेकजणांनी विलगीकरणात नाताळ साजरा केला. ब्रिटनमध्ये नव्यानेच आलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनचीही धास्ती होती. अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट झाल्याने दु:खी वातावरणात नाताळ साजरा करण्यात आला. अद्याप अनेक अमेरिकी नागरिकांना कोरोनाच्या लसीकरणाची प्रतिक्षा आहे.

भारतात ऑनलाइन पद्धतीने सण साजरा
देशात नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त चर्च सुशोभित करण्यात आले होते. कोरोनामुळे निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आल्या. दिल्ली, चेन्नई, अमृतसर व इतर ठिकाणच्या चर्चला लोकांनी भेटी दिल्या. नाताळनिमित्त घरे, चर्च, रस्त्यांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. देशाच्या ईशान्येकडील नागालॅंड राज्यात नाताळचा सण उत्साह व आनंदात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे अनेक चर्चमध्ये तो ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. या ख्रिश्चन बहुसंख्यांक राज्यात कोरोनामुळे यंदा चर्चमध्ये मर्यादित उपस्थिती होती. राजधानी कोहिमात अनेक चर्चंनी गर्दी टाळण्यासाठी मुख्य कार्यक्रम घेण्याचे टाळले.

केरळमध्ये विद्युत रोषणाई
तिरुअनंतपुरम - कोरोनामुळे केरळमध्ये निर्बंध लागू केलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नाताळचा सण शुक्रवारी साधेपणाने साजरा करण्यात आला. नाताळानिमित्त काल मध्यरात्री विविध चर्च आणि कॅथेड्रलमध्ये निवडक नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक प्रार्थना झाली. ख्रिस्ती नागरिकांनी घरीच राहून प्रार्थना केली. मोबाईलवरून एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गाणी शेअर केली. सणानिमित्त सर्वत्र चर्चवर विद्युत रोषणाई केली असली तरी नित्य सेवा मात्र मर्यादित स्वरूपात सुरू होती.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Sharad Pawar: ''...म्हणून झारखंडची निवडणूक महाराष्ट्रासोबत घेतली'' शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या विजयामागचं गुपित

Latest Maharashtra News Updates : नवीन मंत्रिमंडळात दिसणार नवीन चेहरे- सूत्र

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: व्येंकटेश अय्यरव ठरला तिसरा महागडा खेळाडू! जाणून कोणाला किती बोली लागली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

SCROLL FOR NEXT