Unicef sakal
ग्लोबल

Unicef : संघर्षांमध्ये बळी बालहक्कांचा !

संघर्षग्रस्त देशांमध्ये बालकांना विविध सशस्त्र गटांमध्ये ओढले जाते, हिंसाचारात त्यांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात.

पीटीआय

न्यूयॉर्क - जगभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या संघर्षामुळे प्रचंड जीवित आणि वित्त हानी होण्याबरोबरच या प्रदेशांमधील बालकांच्या हक्कांचाही प्रचंड प्रमाणात भंग होत असल्याचे ‘युनिसेफ’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. इस्राईल, पॅलेस्टाइन, काँगो आणि सोमालिया या देशांमध्ये किशोरवयीन मुलांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे ‘युनिसेफ’ने म्हटले आहे.

संघर्षग्रस्त देशांमध्ये बालकांना विविध सशस्त्र गटांमध्ये ओढले जाते, हिंसाचारात त्यांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. मुलींनाही अपहरण आणि लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते. याशिवाय शाळा आणि रुग्णालयांवरही हल्ले होतात, ही बाब ‘युनिसेफ’ने अहवालात निदर्शनास आणून दिली आहे.

या सर्व घटना म्हणजे बालहक्कांचा भंग असल्याचेही ‘युनिसेफ’ने म्हटले आहे. ‘युनिसेफ’चे उप कार्यकारी संचालक ओमर अब्दी यांनी हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये सादर केला. या अहवालानुसार, २०२२ या वर्षात बालहक्कांचा गंभीर भंग झाल्याच्या २७ हजारहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी संख्या आहे.

मागील वर्षी अशा प्रकारच्या जवळपास २४ हजार घटना नोंदल्या गेल्या होत्या. जगभरात एकूण २६ ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरुपाचे संघर्ष सुरु असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवाल तयार झाल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षांबाबतही ओमर अब्दी यांनी माहिती दिली. ‘सुदानमध्ये सुरु असलेल्या संघर्षात दहा लाखांहून अधिक मुले विस्थापित झाली असून हजारो मुले मारली गेली आहेत.

पॅलेस्टीनी बालकांनाही संघर्षाला सामोरे जावे लागत असून त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. बालकांचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन अनेक देश देत असले तरी अनेकांकडून ते आश्‍वासन पाळले जात नाही,’’ अशी खंत अब्दी यांनी व्यक्त केली.

बालहक्क भंगाच्या घटना (२०२२)

  • हक्कभंग - २७१८०

  • पीडित मुले - १८,८९०

  • मृत्यू/जखमी - ८,६२०

  • सशस्त्र गटात भरती - ७,६२२

  • अपहरण - ३,९८५

  • लैंगिक अत्याचार - १,१६५

  • शाळांवर हल्ले - १,१६३

  • रुग्णालयांवर हल्ले - ६४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT