भारतीय कंपनीने बनवलेले धोकादाय कप सिरप मार्शल आयलंड आणि ओशनियामधील मायक्रोनेशियामध्ये सापडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. निकृष्ट दर्जाचे सिरप Guaifenesin Syrup TG Syrup याचा अहवाल WHO कडे देण्यात आला आहे. ६ एप्रिल रोजी हा अहवाल देण्यात आला.
या हानिकारक सिरपची निर्मिती पंजाबमधील QP फार्माकेम लिमिटेड या कंपनीने केली आहे. तर त्यांची मार्केटींक करणारी कंपीनी हरियाणातील ट्रीलियम फार्मा आहे. मात्र उत्पादक किंवा विक्रेत्याने उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल हमी दिलेली नाही, असे WHO ने म्हटले आहे.
Guaifenesin या सिरपचा वापर खोकल्यावर केला जातो. ऑस्ट्रेलियाच्या थेरप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशन (TGA) च्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांद्वारे मार्शल बेटांमधील ग्वायफेनेसिनच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि त्यात डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल दूषित पदार्थ म्हणून प्रमाणात आढळून आले.
विश्लेषणात म्हटले आहे की दूषित पदार्थ डायथिलीन ग्लायकोल आणि उथिलीन ग्लायकोल हे मानवांसाठी विषारी आहेत. याचे सेवन केल्यावर हे प्राणघात ठरू शकतात. WHO ने देखील यासा दुजोरा दिला आहे. हे सिरप निकृष्ट दर्जाचे आहे. याचा वापर केल्यास विशेषत: मुलांमध्ये गंभीर आजार, किंवा मृत्यू होऊ शकतो. पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार, लघवी करण्यास त्रास, डोकेदुखी, मानसिक स्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो, असे WHO ने म्हटले आहे.
Guaifenesin मुळे मृत्यू झाल्याचे WHO ने अद्याप स्पष्ट केले नाही. मात्र त्यांनी धोका असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी या उत्पादनाचा वापर टाळण्याचा सल्ला देखील दिला आहे. बिझनेस टुडे'ने याबाबत वृत्त दिले आहे.
यापूर्वी देखील गेल्या वर्षी गांबिया, इंडोनेशिया आणि उझबेकिस्तानमध्ये ३०० हून अधिक मुलांचा (मुख्यतः ५ वर्षाखालील) दूषित औषधांमुळे झालेल्या तीव्र मूत्रपिंडाच्या दुखापतीमुळे मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.