ग्लोबल

देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ;  देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत चालली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी देशात 9,851 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. शनिवारी ही संख्या 10 हजारावर पोहोचण्याची शक्यता आहे. याचा अर्थ देशात  सरासरी 4.6 टक्काने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शुक्रवारपर्यंत देशात एकुण कोरोना बाधितांची संख्या 2,36,667 पर्यंत गेली आहे. रुग्णसंख्येत  या गतीने वाढ झाल्यास  कोरोना बाधित देशांच्या रांगेत लवकरचं भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे.

परागकर कॉम नावाच्या वेबसाईटनूसार देशात रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने वाढ होत चालली आहे. सध्या रुग्णवाढीचा दर 4.4 वरुन 4.6 टक्यापर्यंत गेला आहे. दिल्लीमध्ये रुग्णवाढीचा दर 6 वरुन 6.4 टक्कावर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात रुग्णवाढ 3.4 वरुन 3.6 टक्के  एवढा वाढला आहे. तर  पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये रुग्णवाढीचा दर अनुक्रमे 6 आणि 3.4 टक्के एवढा आहे. या दोन्ही राज्यामध्ये दर दिवशी रुग्णांच्या संख्येत 0.2 टक्क्याने वाढ होत आहे. 

दिवसाला 0.8 टक्के एवढी सरासरी रुग्णवाढ जरी धरली. तरी या दराने जून महिन्याच्या शेवटी देशात कोरोना बाधितांची सख्या 5,64,238 एवढी होईल. असं अनूमान या वेबसाईटने काढले आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनूसार भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. 

मात्र जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना बाधितांच्या मृत्युचे प्रमाण अंत्यत कमी आहे. देशात कोरोनामुळे प्रति 10 लाख लोकामागे केवळ 5 जणांचा मृत्युची नोंद आहे. देशात आतापर्यंत 6,642 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर प्रती दहा लाख लोकसंख्येमागे देशात 164 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

....
जगभऱात 67 लाख लोकांना बाधा
जगात 67 लाखावरुन अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत 3,94,500 लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. चीनपासून सुरु झालेल्या कोरोना संसर्गाच्या तडाख्यापासून जगातील एकही देश सुटला नाही. 
...
जगातिल सर्वात जास्त कोरोना बाधित देश
 
1.अमेरिका
कोरोना बाधितांची संख्या-  19,11,576 
मृत्यु- 109,299 

2. ब्राझील 
कोरोना बाधितांची संख्या -  6,14,941 
मृत्यु-  34,021 

3. रशिया 
कोरोना बाधितांची संख्या - 4,49,256 
मृत्यु- 5520

4. ग्रेट ब्रिटेन
कोरोना बाधितांची संख्या - 2,83,311
मृत्यु – 40,261 

5. स्पेन 
कोरोना बाधितांची संख्या - 2,40,978 
मृत्यु- 27,134

6. भारत 
कोरोना बाधितांची संख्या - 2,36,667 
मृत्यु- 6,642

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT